For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

240 किलोमीटरचा सर्वात कंटाळवाणा रस्ता

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
240 किलोमीटरचा सर्वात कंटाळवाणा रस्ता
Advertisement

चालकाला हमखास येते झोप

Advertisement

लोक जेव्हा सरळ महामार्गावर ड्रायव्हिंग करणे किंवा बाइकवर रायडिंग करतात, तेव्हा ते इतके बोरिंग होते की चालकांना झोप येते. चालकाला डुलकी आल्याने वाहनाचा अपघात झाल्याची शेकडो प्रकरणे समोर आली आहेत. परंतु लोक जेव्हा वळणदार रस्त्यांवर ड्रायव्हिंग करतात, तेव्हा त्यांना अधिक प्रमाणात ब्रेकचा वापर करावा लागतो. यामुळे त्यांची नजर सावध असते. परंतु जगातील एका रस्त्याला सर्वात बोरिंग रोड मानले जाते. या मार्गावर वाहन चालवितेवेळी चालकाला झोप येते किंवा तो दुर्घटनेचा शिकार ठरतो. सौदी अरेबियात 240 किलोमीटरचा एक मार्ग असून त्याला जगातील सर्वात लांबीचा सरळ मार्ग मानला जातो. परंतु याचबरोबर हा मार्ग सर्वात कंटाळवाणा मार्ग या नावानेही कुख्यात आहे.

सौदी अरेबियाचा हायवे-10 हा एकूण 1474 किलोमीटर लांबीचा आहे. हा महामार्ग अल-दर्ब आणि अल-बाथा यासारख्या शहरांना जोडतो. पूर्वी या मार्गाला किंग फहाद यांचा खासगी मार्ग म्हणून विकसित करण्यात आले होते. परंतु आता तो जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. हा मार्ग गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक लांबीचा सरळ मार्ग म्हणून नोंदला गेला आहे. या मार्गाला बोरिंग म्हटले जाते, कारण हा मार्ग वाळवंटातून जातो, येथे कुठल्याही प्रकारची झाडे, शेती, इमारती किंवा लोकांचे अस्तित्व दिसून येत नाही. याचमुळे सरळ दिशेत वाहन चालवून लोक कंटाळून जातात, यामुळे चालकाला झोप येण्याची शक्यता असते. या रस्त्याला कुठलेच वळण नाही. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार या मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यास सुमारे 2 तासांचा कालावधी लागतो. अल-बथा शहरानजीक पोहोचल्यावर या रस्त्यामध्ये काही प्रमाणात वळणे दिसून येतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.