For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बदलला कॅनडाचा सूर

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
बदलला कॅनडाचा सूर
Advertisement

नरेंद्र मोदींचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंकडून अभिनंदन

Advertisement

वृत्तसंस्था /ओटावा

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा देशात रालोआचे सरकार स्थापन होणार आहे. 9 जून रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या प्रमुखांनी मोदींचे लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन पेले आहे. याचदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्यांच्या निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन. कॅनडा त्यांच्या सरकारसोबत मिळून काम करण्यासाठी तयार आहे. आमच्या देशांच्या लोकांदरम्यान मानवाधिकार, विविधता आणि कायद्याच्या शासनावर आधारित संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे ट्रुडो यांनी नमूद पेले आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान ट्रुडो यांनी भारत सरकारच्या हस्तकांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला होता. तर भारताने कॅनडाचा हा आरोप फेटाळला होता. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध काहीसे दुरावले आहेत.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी फोन करत नरेंद्र मोदींचे निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केले आहे.  तर अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी नव्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी आणि रालोआला शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement

.