महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात सुंदर मकबरा

06:26 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आतील सजावट पाहून व्हाल  दंग

Advertisement

मेनमात्रे सेटी प्रथम प्राचीन इजिप्तच्या 19 व्या राजवंशाचे दुसरे राजा होते. त्यांनी ख्रिस्तपूर्व 1294 पासून 1279 पर्यंत शासन केले होते. मेनमात्रे सेटी प्रथम यांचा मकबरा इजिप्तच्या किंग्स व्हॅलीमध्ये असून तो सर्वात लांब, सर्वात खोल आणि सर्वाधिक सुंदरपणे सजविण्यात आलेल्या कब्रांपैकी एक आहे. याच्या आतील दृश्य अत्यंत भव्य असून याची सजावट पाहून तुमचे डोळे दिपून जातील.

Advertisement

या मकबऱ्याच्या शोधकर्त्याच्या नावावर कधीकधी याला ‘बेल्नोजीचा मकबरा’ असेही म्हटले जाते. मकबऱ्याखालील दफन कक्षाच्या गुंबददार छतावर आकाश आणि त्यातील ताऱ्यांना रेखाटण्यात आले आहे, त्यावर प्रकाश पडताच हे चित्र चमकते, बैल आणि इजिप्तच्या संस्कृतीशी निगडित अन्य कलाकृतीही भिंतींवर रेखाटण्यात आल्या आहेत.

किंग्स व्हॅलीमध्ये अन्य कब्रांप्रमाणे सेटी प्रथमच्या कब्रला विविध अंत्येष्टि ग्रंथांनी सजविण्यात आले आहे. याचा उद्देश मृत्यूनंतरच्या जीवनातील यश सुनिश्चित करणे होता. सेटी प्रथमची कब्रा किंग्स व्हलॅमध्ये पूर्णपणे सजविण्यात आलेला पहिला मकबरा होता, ज्यातील चित्रांची सुंदरता अव्वल दर्जाची आहे. यासाठीच सेटी प्रथमचा शासनकाळ अत्यंत प्रसिद्ध होता.

मकबऱ्याच्या छताला सजविण्यासाठी भव्य खगोलीय दृश्य देखील तयार करण्यात आले आहे. मकबऱ्यात आणखी अनेक अनोखी वैशिष्ट्यो असून सेटी प्रथमचा मकबरा गुंबदार छतयुक्त दफनकक्ष असलेला पहिला मकबरा देखील आहे. 1821 मध्ये सेटी प्रथमच्या मकबऱ्यातील अनेक खोल्यांमधील चित्रांना लंडनच्या पिकाडिलीमध्ये इजिप्तिशिय हॉलमध्ये दाखविण्यात आले होते. हे प्रदर्शन मकबऱ्याचा शोधकर्ता जियोवानी बतिस्ता बेल्जोनी यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article