जगातील सर्वात सुंदर वाघिण
सोनेरी रंग, प्रेमळ चेहरा, थायलंडच्या प्राणिसंग्रहालयाची नवी स्टार
थायलंडच्या एका प्राणिसंग्रहालयातून अलिकडेच बेबी हिप्पो मू डेंगची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. आता सुंदर सोनेरी वाघिणीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याला युजर्सनी सर्वात सुंदर वाघिण संबोधिले आहे. या वाघिणीचे नाव एवा आहे. एवा सध्या थायलंडच्या एका प्राणिसंग्रहालयात असून तेथील ती सुपरस्टार ठरली आहे.
ऑफिशियल पेजवर एवाची काही सुंदर छायाचित्रे शेअर करण्यात आली हेती. एवाची बहिण लुनाची देखील छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. क्यूट मू डेंग देखील याच सफारीमध्ये राहतो. आता बेबी मू डेंगनंतर एवाची छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. एवा आणि लूना यांचा 16 फेब्रुवारी 2021 रोजी जन्म झाला होता आणि त्यांचे वय केवळ 3 वर्षे आहे.
जन्माच्या तीन आठवड्यांनी त्यांना लोकांसमोर आणले गेले होते. एवा आणि लूनाच्या पालकांना चेक प्रजासत्ताकमधुन थायलंडच्या सफारीत 2015 मध्ये आणले गेले होते. आता त्यांची छायाचित्रे शेअर करण्यात आली असून ती वाइल्ड लाइफ अॅनिमल्सच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली आहेत. गोल्डन टायगर हे बंगाल टायगरचे रेयर व्हेरिएंट असतात. सोशल मीडिया युजर्स एवाला सुंदर, गोंडस, युनिक ठरवत आहेत. तसेच एवाची बहिण लूनाचे देखील कौतुक करत आहेत.