नदीकाठावर वसलेले सर्वात सुंदर शहर
दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध
जगभरात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जेथे लोक परिवारासोबत फिरू इच्छितात, यातील काही लोकांना पर्वतीय ठिकाणं तर बर्फ पसंत असतो. तर काही जणांना समुद्र आवडतो, परंतु या दोन्हींपासून हटके काही वेगळा आणि अनोखा अनुभव इच्छित असल्यास ब्रिटनमध्ये एक असे जादुई ठिकाण आहे, जे समुद्र नव्हे तर एका सुंदर आणि शांत नदीच्या काठावर वसलेले आहे. हे आहे डेवोनचे डार्टमाउथ.
डार्टमाउथचे दृश्य इतके मंत्रमुग्ध करणारे आहे की क्षणक्षरात तुमच्या या सौंदर्यात हरवून जाल. येथील वस्ती एका पऱ्यांच्या कहाण्यांसारखी आहे, जेथे प्रत्येक गोष्ट परिपूर्ण वाटते आणि हेच याला एक स्वप्नांच्या जगासारखे स्वरुप प्राप्त करून देते. डार्टमाउथ शहराच्या सौंदर्याची खरी जादू याच्या गल्ल्यांमध्ये लपलेली आहे. येथील वेडीवाकडी गल्ल्या आणि दगडांनी तयार केलेले रस्ते, रंगबिरंगी अनोख्या कॉटेजने सजलेल्या आहेत.
शहरात फिरण्यासाठी अनेक आकर्षक बाजार असून यात डार्टमाउथ ओल्ड मार्केटही सामील आहे, जो दर शुक्रवारी स्थानिक उत्पादन आणि कारागिरांसोबत भरतो. हा बाजार 1828 मध्ये एक ‘पॅनियर’ बाजाराच्या स्वरुपात सुरू झाला होता. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी डार्टमाउथ गुड फूड आणि अर्टिसन मार्केटमध्ये तुम्ही डार्टमूर मध आणि ताजा ब्रेड यासारख्या स्थानिक स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता. खाण्यापिण्याच्या शौकिनांसाठी एंबँकमेंट बिस्ट्रो आणि रॉकफिश यासारखी अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंट्स देखील आहेत. जेथे आकर्षक फिश आणि चिप्सचा स्वाद घेऊ शकता. या शहराचा इतिहासही याच्या सौंदर्याइतकाच समृद्ध आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठिकाणं असून ज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण डार्टमाउथ कॅसल असून तो 600 वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. कॅसलमध्ये गन टॉवर आणि वळणदार रस्ते पाहू शकता, जे 100 वर्षांच्या युद्धादरम्यानची कहाणी सांगणारे आहेत.
शहराच्या दुसऱ्या टोकाला ब्रिटानिया रॉयल नेव्हल कॉलेज असून तेथे आजही रॉयल नेव्हीच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाते. येथील दोन तासांचा गायडेड टूर तुम्हाला याच्या 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देतो. याचबरोबर बेयार्ड्स कोव फोर्टसारखा जुना किल्ला असून तो 1522 साली निर्माण करण्यात आला होता आणि ज्याला मोफत पाहता येते.
डार्टमाउथचे सर्वात खास वैशिष्ट्या म्हणजे येथील नदी आणि काठ आहेत. हे शहर समुद्र काठावर नसलेतरीही येथील कैसल कोव आणि सुगरी कोवसारखे सुंदर काठ आहेत. येथे परिवारासोबत जात सौंदर्याचा आनंद घेता येतो. सुगरी कोव खासकरून स्थानिक लोकांच्या पसंतीचे ठिकाण आहे, जे शांत आणि कमी गर्दीयुक्त आहे, कारण येथे पोहोचण्यासाठी उभे जिने उतरावे लागतात. नदीवर बोट ट्रिप्सचा आनंद घेणे एक आकर्षक अनुभव आहे. ज्यात ‘द फिज बोट’ अत्यंत लोकप्रिय आहे. पाणी नेहमीच स्वच्छ असते आणि तुम्ही चालता चालता नदी काठावरून प्रवाहात मासे पाहू शकता.
डार्टमाउथ रॉयल रेगाटामध्ये नौकानयन, लाइव्ह संगीत आणि आतिषबाजी यासारखे आयोजन केले जाते. तर जगातील अखेरची सागरी पॅडल स्टीमर ‘वेवरली’ची झलक येथे पाहता येते. डार्टमाउथपर्यंत पोहोचणे तुलनेत सोपे आहे, किंग्सवेयरपर्यंत रेल्वेने जाता येते आणि मग एक छोटी पॅसेंजर फेरी घेत शहरापर्यंत पोहोचता येते. जे लोक वाहनाने जाणे पसंत करतात, ते किंग्सवेयर येथून कार फेरी घेऊ शकतात. जर येथे वास्तव्य करण्याचा विचार असेल तर अनेक सुंदर हॉलिडे कॉटेज उपलब्ध आहेत. जेथून नदीचे सुंदर दृश्य पाहता येते.