जगातील सर्वात अद्भूत खडक
दिसण्यास तंतोतंत हत्तीसारखा
एलीफेंट रॉक आइसलँडमध्ये आहे. हा खडक जगातील सर्वात अद्भूत खडकांपैकी एक आहे. याचा आकार एक मोठ्या हत्तीप्रमाणे दिसतो, ज्याची सोंड पाण्यात बुडालेली असल्याचा भास होतो. या विशेष आकारामुळे याला एलीफेंट रॉक हे नाव देण्यात आले आहे. एलीफेंट रॉक येथील वेस्टमॅन बेटसमुहात हेइमेई बेटावर एक नैसर्गिक खडक आहे. आता याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला पाहून तुम्ही याच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ एका युजरने पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनदाखल त्याने ‘एलीफेंट रॉक... सर्वात अद्भूत खडक संरचनांपैकी एक’ नमूद पेले आहे. येथे आइसलँडच्या फेमस एलीफेंट रॉकचा एक संग्रह आहे. ही नैसर्गिक बेसॉल्ट संरचना एका मोठ्या हत्तीच्या शीराप्रमाणे दिसते, ज्याची सोंड पाण्यात बुडालेली आहे.
अलिकडेच हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून याला मोठ्या संख्येत ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओला आतापर्यंत 4.5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच मोठ्या संख्येत लोकांनी त्याविषयी कॉमेंट देखील केली आहे. एलीफेंट रॉक एक बेसॉल्ट खडक असून त्याची निर्मिती एल्डफेल ज्वालामुखीच्या विस्फोटादरम्यान झाली होती. हा खडक शतकांपासून सागरी लाटांचा मारा आणि वाऱ्यामुळे हळूहळू नष्ट होत आहे. यामुळे कालौघात याला पाण्यात स्वत:ची सोंड बुडविलेल्या हत्तीसारखा आकार मिळाला आहे.