For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरात येणारे धन पुण्याईचे असले पाहिजे!

12:36 PM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
घरात येणारे धन पुण्याईचे असले पाहिजे
Advertisement

गुरुवर्य इंद्रजित देशमुख यांचे प्रतिपादन : लोकमान्य रंगमंदिरात संजीविनी फाऊंडेशनतर्फे कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : आपल्या मुलांना सावरण्यासाठी मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोलाची भूमिका असते. आज काल श्रम कोलमडून गेले असून आज अश्रू पुसण्यासाठी हातांची कमतरता भासत आहे. सध्या माणसातील संवेदनशीलता संपत चालली आहे. घरात येणारे धन हे पुण्याईचे असले पाहिजे. प्रत्येकाने जगायचे तर महोत्सवाप्रमाणे जगावे, असे प्रतिपादन गुरुवर्य इंद्रजित देशमुख यांनी केले. लोकमान्य रंगमंदिर येथे संजीविनी फाऊंडेशनच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित उमंग-2025 कार्यक्रमात ते बोलत होते. देशमुख म्हणाले, पद व सत्ता नश्वर असून देवाने मानवाला विज्ञान व आनंदमय कोष दिला आहे. दुसऱ्याचे जगणे पाहण्याऐवजी आपल्या अंतर्मनातून जगणे गरजेचे आहे. यश मिळवायचे असेल तर एकाग्रता असणे आवश्यक आहे. जीवन आवडीने, उद्देशाने व आनंदाने या तीन टप्प्यात जगणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे आपले जीवन सुखकर होईल, असे त्यांनी सांगितले. आपला संसार चालविण्यासाठी कोणी येणार नसून आपल्या संसाराचा गाडा आपणच चालविला पाहिजे.

वृद्धापकाळ हा तरुणाईप्रमाणे जगला पाहिजे. वृद्धपण म्हणजे विकास आणि समृद्धता असून वृद्धापकाळ हा फुललेला असला पाहिजे. दान करताना डोळे बंद करून दान केले पाहिजे. दुसऱ्यांचे दु:ख, त्यांच्या वेदना समजून त्यांना मदत करणे म्हणजे सर्वश्रेष्ठ दान, असे त्यांनी सांगितले. विश्वाच्या कल्याणासाठी मागणारे दान हे पसायदान आहे. ज्येष्ठता म्हणजे महातारा असून वृद्धापकाळ हा मृदू असला पाहिजे. माणसाने आनंददायी जीवन जगावे. यशस्वी माणसे ही तेजोमय असतात. यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे. आपल्या जीवनात सेवा करत राहिले पाहिजे. नैराश्येला थारा न देता हसत व आनंदमय जीवन जगावे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी गीतकार शंकर पाटील, साहित्यिका सुनीता पाटणकर व स्मिता पाटील यांचा सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संस्थापक डॉ. सविता देगीनाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, श्रोते उपस्थित होते. चेअरमन मदन बामणे यांनी संजीविनीच्या कार्याची माहिती दिली. तेजस्विनी तमुचे यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement

गायन-नृत्य विजेत्यांचा सन्मान

संजीविनी फौंडेशनच्यावतीने ऑनलाईन गायन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी या कार्यक्रमात पार पडली. यामध्ये प्रथम कृष्णा मर्दूर, द्वितीय किशोर काकडे तर तृतीय क्रमांक श्रीनिवास नाईक यांनी पटकाविला. याचबरोबर फौंडेशनच्यावतीने नृत्य स्पर्धाही घेण्यात आली होती. यामध्ये प्रथम राजश्री हावळ, द्वितीय उषा गंगवाणी, प्रेमा उपाध्याय यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Tags :

.