For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : अक्कलकोट रोड परिसराची दयनीय अवस्था! महिलांचा महापालिकेत उसळला संताप

05:59 PM Nov 19, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   अक्कलकोट रोड परिसराची दयनीय अवस्था  महिलांचा महापालिकेत उसळला संताप
Advertisement

                                  अक्कलकोट रोड परिसरातील महिलांचा इशारा –

Advertisement

सोलापूर : अक्कलकोट रोड परिसरातील विविध नगरांमध्ये महापालिकेकडून पाणी ड्रेनेज आणि रस्त्यांची वेगवेगळी विकास कामे अर्धवट करण्यात आली आहेत असा आरोप येथील रहिवाशांनी केला. सोमवारी या नगरांमधील महिलांनी महापालिकेत येऊन जनता दरबारात आपले ग्राहाणे मांडले. विकास कामे अर्धवट करण्यात आल्याने याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्यात येऊन यासह विविध सोयी सुविधा नगरातील नागरिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी महिलांनी जनता दरबारात केली.

अक्कलकोट रस्त्यावरील तसेच एमआयडीसी परिसरातील अंबिका नगर, ईश्वर नगर, गंगा नगर, विश्वास नगर, तिरूपती नगर, कमलेश्वर नगर, हिमगिरी नगर भाग २-३, फामाक्षी नगर आदी नगरे असून या नगरांमधील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र ही पाईपलाईन डिमगिरी नगरापर्यंतच येऊन काम अर्धवट राहिले आहे. अनेकवेळा महापालिकेत तक्रार करण्यात आली.

Advertisement

नगरात नळ, ड्रेनेज व पोलची सुविधा करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले. पण बजेट नसल्याचे सांगण्यात येते. आजपर्यंत ट्रॅक्टराण्यारे पाणीपुरवठा केला जातो. असे किती दिवस चालणार अशी विचारणा करत महिलांनी जनता दरबारात महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांचे लक्ष वेधून घेतले. या भागातील विविध विकास कामे तातडीने करण्यात यावीत अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी विविध नगारांमधील अंबिका देवकर, सुवर्णा विटकर, रेखा पवार, कमलाबाई पवार, आसमा शेख, मुमताज सय्यद, सविता बंदपट्टे, अन्नपूर्णा देशमुख, कमळाबाई मंजुळकर, महादेवी जाधव, अंबाबाई पवार, यल्लमा अलकुंटे, सुनिता बटोने, सुशाबाई केंगरे, वनमाला बंदपट्टे, लक्ष्मी शिदे, सुनिता चौगुले, चंदा शिदे आदी उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :

.