पुरुष टेबल टेनिस संघाच्या खात्यातही कांस्यपदक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कझाकस्तानच्या अस्ताना येथे गुऊवारी झालेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय पुऊष संघाची वाटचाल उपांत्य फेरीत चिनी तैपईविरुद्ध 0-3 अशी संपुष्टात आली आणि कांस्यपदकावर त्यांना समाधान मानावे लागले. भारतीय महिला संघानेही बुधवारी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. 1972 मधील स्पर्धेच्या सुऊवातीपासूनचे देशाचे महिला गटातील हे पहिले पदक आहे. अचंता शरथ कमलला जागतिक क्रमवारीत 42 व्या क्रमांकावर असलेला त्याचा प्रतिस्पर्धी लिन युन-जूविऊद्धचा सामना कठीण गेला. लिनच्या अचूकतेमुळे भारतीय खेळाडूला स्थिरावणे कठीण झाले. शरथ कमलने 11-7, 12-10, 11-9 अशी ही लढत गमावली. पुढील लढतीत मानव ठक्कर जागतिक क्रमवारीत 22 व्या क्रमांकावर असलेल्या काओ चेंग-जुईकडून पराभूत झाला. या सामन्याचा निकाल 11-9, 8-11, 11-3, 13-11 असा चिनी तैपेईच्या खेळाडूच्या बाजूने लागला आणि 2-0 अशी आघाडी मिळाली. तिसऱ्या लढतीत हरमित देसाईलाही निराशेचा सामना करावा लागला. कारण भारतीय पॅडलरला हुआंग यान-चेंगकडून 6-11, 9-11, 7-11 असा पराभव पत्करावा लागला.