या पक्ष्याची स्मरणशक्ती आहे जबरदस्त
माणसांप्रमाणे करतात मेंदूचा वापर
जगभरात लाखो प्रजातींचे जीव-जंतू आढळून येतात. या सर्व जीवांचे स्वत:चे असे वैशिष्ट्या असते. अशाच एका पक्ष्याची स्मरणशक्ती माणसांप्रमाणे अत्यंत तीव्र आहे. छोटासा आणि काळ्या-पांढऱ्या रंगात दिसून येणाऱ्या या पक्ष्याचे नाव चिकैडी आहे. उत्तर अमेरिकेत वास्तव्य करणारा हा छोटा पक्षी स्वत:च्या स्मरणशक्तीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी चिकैडीला हजारो ठिकाणी स्वत:चे भोजन कुठे लपविले आहे हे आठवणीत ठेवावे लागते. छोटासा मेंदू असलेला हा पक्षी इतके सर्व काही कसे आठवणीत ठेवू शकतो असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असतो.
या पक्ष्याच्या मेंदूवर संशोधन करण्यात आले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या जुकरमॅन इन्स्टीट्यूटच्या वैज्ञानिकांनी याविषयी संशोधन केले असता चिकैडीकडे एक गुप्त स्मरणशक्ती कोड असल्याचे आढळले आहे. जेव्हा आम्ही स्वत:ची गाडी कुठल्या मोठया पार्किंग एरियात कुठे पार्क केली आहे हे आठवतो, तेव्हा आम्ही लेव्हल, सेक्शन आणि वृक्ष आणि भिंतीला लँडमार्क म्हणून आठवणीत ठेवतो. तशाचप्रकारे चिकैडी देखील करतो. परंतु तो अत्यंत अधिक जटिल आणि प्रभावीपणे हे आठवणीत ठेवत असतो असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
सेल नियतकालिकात प्रकाशित अध्ययनानुसार चिकैडीच्या मेंदूत प्रत्येक अन्नाच्या ठिकाणासाठी खास न्यूरल हालचाली होतात. हे एकदम बारकोडप्रमाणे असते. प्रत्येक स्मृती मेंदूच्या हिप्पोकॅम्पसमध्ये एका खास प्रकारच्या हालचालीच्या पॅटर्नशी जोडलेली असते. हा पॅटर्न बारकोडप्रमाणे असतो, बारकोडप्रमाणेच दोन वेगवेगळ्या गोष्टी किंवा ठिकाणांच्या स्मृतीची माहिती एकमेकांजवळ राहूनच वेगळ्या प्रकारे ओळखली जाते.
चिकैडी स्वत:चे भोजन जेव्हा कधी लपवितात, त्याच्या मेंदूच्या स्मरणशक्तीचे केंद्र म्हटले जाणाऱ्या हिप्पोकॅम्पसच्या 7 टक्के न्यूरॉन खास पद्धतीने स्मृती तयार करतात. चिकैडीला जेव्हा त्या जागेला आठवायचे असते, तेव्हा खास प्रकारचा पॅटर्न पुन्हा निर्माण होतो. हा स्मरणशक्तीच्या स्कॅनरप्रमाणे काम करतो.