प्रियदर्शनी नवहिंद महिला मल्टिपर्पज सोसायटीची सभा उत्साहात
वार्ताहर/येळ्ळूर
प्रियदर्शनी नवहिंद महिला मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी येळ्ळूरची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवनाच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन माधुरी पाटील होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलवन करून दिवंगत सभासदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
चेअरमन माधुरी पाटील यांनी सोसायटीकडे वर्षाखेरीस 71 कोटी खेळते भांडवल, 2 कोटी 75 लाख निधी, 10 कोटी 68 लाख गुंतवणूक, 67 कोटी 35 लाख ठेवी, 58 कोटी 21 लाख कर्जे वाटप, 57 लाख भाग भांडवल असून यावर्षी सोसायटीला 5 लाख 75 हजार नफा झाला तर सोसायटीची स्थावर मालमत्ता 1 कोटीची असल्याचे सांगितले.
मागील वर्षाचा वृत्तांत वंदना धामणेकर यांनी, नफा-तोटा पत्रकाचे वाचन संध्या चौगुले यांनी, ताळेबंद पत्रकाचे वाचन शामल जाधव, नफा विभागणी पत्रकाचे वाचन सोनाली खामकर व अंदाज पत्रकाचे वाचन सीमा घाडी यांनी सादर केले.
यावेळी व्हा. चेअरमन सुरेखा सायनेकर, संचालिका सुनीता कणबरकर, वैशाली मजुकर, नम्रता पाटील, रेखा पाटील, राजश्री दणकारे, किर्ती डेंबरे, रेखा य. पाटील, लक्ष्मी हुवान्नावर, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, सी. बी. पाटील, नारायण बस्तवाडकर, नवहिंद सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश अष्टेकर, न्यू हिंद सोसायटीचे अध्यक्ष नारायण जाधव, नवहिंद क्रीडा प्रबोधिनी केंद्राच्या अध्यक्षा नीता जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता जाधव यांनी तर आभार नम्रता पाटील यांनी मानले.