For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

6 कंपन्यांचे बाजार मूल्य 86 हजार 847 कोटी रुपयांनी वाढले

06:13 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
6 कंपन्यांचे बाजार  मूल्य 86 हजार 847 कोटी रुपयांनी वाढले
Advertisement

सेन्सेक्स होता 657 अंकांनी वधारलेला : एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रिज आघाडीवर : स्टेट बँक, एलआयसी नुकसानीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शुक्रवारी संपलेल्या आठवड्यामध्ये आघाडीवरील 10 पैकी 6 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 86,847.88 कोटी रुपयांनी वाढलेले दिसून आले आहे. यामध्ये एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या बाजारभांडवल मूल्यामध्ये सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली आहे.

Advertisement

मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 657 अंकांनी वाढला होता तर निफ्टी जवळपास 225 अंकांनी वाढत बंद झाला होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांनी सर्वाधिक भांडवलात वाढ केली होती. या विरुद्ध पाहता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांच्या बाजार भांडवलामध्ये मात्र मागच्या आठवड्यात घसरण झाली आहे.

यांचे मूल्य वधारले

एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 20235 कोटी रुपयांनी वाढत 13 लाख 74 हजार 945 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या तुलनेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 20230 कोटी रुपयांनी वाढत 16 लाख 52 हजार 235 कोटी रुपयांवर पोहोचले होते. त्याचप्रमाणे आयटीसी या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 17 हजार 933 कोटी रुपयांनी चढत 5 लाख 99,185 कोटी रुपयांवर तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 15254 कोटी रुपयांनी वाढत 9,22,703 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दूरसंचार क्षेत्रातील भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 11 हजार 948 कोटी रुपयांनी वाढत 9 लाख 10 हजार 735 कोटी रुपयांवर पोहोचले होते.

यांचे बाजार भांडवल घसरणीत

घसरणीचा विचार करता स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 11,557 कोटी रुपयांनी घसरत 7 लाख 13 हजार 567 कोटींवर राहिले होते. याचप्रमाणे जीवन विमा क्षेत्रातील मोठी कंपनी एलआयसी यांचे बाजार भांडवलमूल्यसुद्धा 8412 कोटी रुपयांनी कमी झाले होते. एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य आता 5 लाख 61 हजार 406 कोटी रुपये झाले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसच्या  भांडवलात मागच्या आठवड्यात घसरण अनुभवायला मिळाली. 2 हजार 283 कोटी रुपयांनी बाजार भांडवल घटत 7,95,803 कोटी रुपयांवर बाजार भांडवल मूल्य घसरले.

Advertisement
Tags :

.