पोलादाच्या किमती वाढण्याची शक्यता
रेटिंग एजन्सी क्रीसीलचा अंदाज
नवी दिल्ली :
पोलादाच्या किंमती यंदा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता क्रीसील या रेटिंग एजन्सीने व्यक्त केली आहे. पुढच्या महिन्यापर्यंत पोलादाच्या आयातीवर सुरक्षा शुल्क लागू करण्यात आले तर यंदा पोलादाच्या किमती वाढू शकतात.
क्रीसीलच्या मते जागतिक बाजारात पोलादाच्या किमती कमी होत आहेत पण भारतात मात्र सुरक्षा शुल्क लागू होत असून त्यामुळे किमती 4 ते 6 टक्के इतक्या वाढू शकतात, असे म्हटले जात आहे. देशांतर्गत कारखाने नव्या प्लांटमुळे पुरवठा वाढवू शकते, ज्यामुळे फ्लॅट स्टीलचे दर काहीसे कमी होऊ शकतात. पण 2025 मध्ये किमती 2024 च्या तुलनेत जास्त असतील असे क्रीसीलचे म्हणणे आहे. 2024 मध्ये पोलादाच्या आयातीत वाढ आणि उपलब्धताही जास्त राहिल्याने किमती कमी झाल्या होत्या. हॉट रोल्ड कॉइलच्या किमती 9 टक्के इतक्या कमी झाल्या. पण कोकींग कोलचे दर कमी झाल्याने उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला होता. या किमती 12 टक्के कमी झाल्या पण लोहखनिजचे दर 9 ते 10 टक्के वाढल्या. भारतात यावर्षी पोलादाची मागणी 8 ते 9 टक्के वाढू शकते. गृहबांधणी व पायाभूत सुविधांमध्ये पोलादाचा अधिक वापर होतो. अभियांत्रिकी, पॅकेजींग व इतर क्षेत्रांतही पोलादाची मागणी वाढलेली आहे.