For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आघाडीच्या पाच सिमेंट कंपन्यांचा बाजार हिस्सा 55 टक्क्यांपर्यंत वाढेल

06:08 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आघाडीच्या पाच सिमेंट कंपन्यांचा बाजार हिस्सा 55 टक्क्यांपर्यंत वाढेल
Advertisement

आयसीआरएच्या अहवालामधून माहिती : दालमिया भारत, श्री सिमेंट्स आणि जेके सिमेंट कंपन्यांही उत्पादनात सक्रिय

Advertisement

वृत्तसंस्था/  मुंबई

मुख्य पाच देशांतर्गत सिमेंट उत्पादक कंपन्या मार्च 2025 पर्यंत त्यांच्या स्वत:च्या अधिग्रहण आणि विस्तार योजनांद्वारे त्यांचा बाजारातील हिस्सा 55 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात, अशी एका अहवालात शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रेटिंग एजन्सी आयसीआरएने एका अहवालात म्हटले आहे की, वाढती मागणीची शक्यता लक्षात घेता, मोठ्या सिमेंट कंपन्या सध्या त्यांची क्षमता वाढवण्यावर आणि बाजारातील हिस्सा राखण्यावर भर देत आहेत.

Advertisement

प्राप्त अहवालानुसार, आयसीआरएचा अंदाज आहे की, मार्च 2025 पर्यंत मुख्य पाच सिमेंट कंपन्यांचा बाजारातील हिस्सा 55 टक्क्यांपर्यंत वाढेल, ज्यामुळे सिमेंट उद्योगात एकत्रीकरणाची परिस्थिती निर्माण होईल. या कंपन्यांचा बाजार हिस्सा मार्च 2015 पर्यंत 45 टक्के होता, जो डिसेंबर 2023 पर्यंत 54 टक्के झाला.

अहवालानुसार, अदानी समुहाने एसीसी आणि अंबुजा सिमेंट्सचे संपादन वगळता, या क्षेत्रातील इतर विलीनीकरण आणि संपादन सौदे प्रामुख्याने अधिग्रहित घटकाकडे रोख प्रवाह नसल्यामुळे किंवा समूहाच्या आर्थिक दबावामुळे पार पाडले गेले. याशिवाय दालमिया भारत, श्री सिमेंट्स आणि जेके सिमेंट सारख्या इतर मोठ्या कंपन्या देखील सिमेंट उत्पादनात सक्रिय आहेत. अनुपमा रे•ाr, उपाध्यक्ष आणि सह-समूह प्रमुख (कॉर्पोरेट रेटिंग) यांनी सांगितले की, ऑपरेटिंग उत्पन्नात चांगली वाढ, ऑपरेटिंग मार्जिनमधील सुधारणा यामुळे सिमेंट उत्पादकांची  परिस्थिती स्थिर राहण्याची शक्यता आहे.

अदानी समूह सिमेंट कंपन्यांच्या अधिग्रहणाच्या तयारीत

सिमेंट क्षेत्रात विस्तार करण्याच्या योजनेचा भाग म्हणून अदानी समूह अनेक सिमेंट कंपन्या खरेदी करू शकतो. यामध्ये हैदराबादस्थित पेन्ना सिमेंटचे 100 टक्के अधिग्रहण नुकतेच अंबुजा सिमेंटने केले आहे. याशिवाय गुजरातमधील सौराष्ट्र सिमेंट, जयप्रकाश असोसिएट्सचा सिमेंट व्यवसाय आणि एबीजी शिपयार्डच्या मालकीच्या वदराज सिमेंटचे अधिग्रहण आगामी काळात होऊ शकते. उपलब्ध माहितीनुसार या गुंतवणुकीद्वारे, समूहाने आपली सिमेंट उत्पादन क्षमता वाढवणे आणि बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अदानी समूहाने या संपादनासाठी 3 अब्ज डॉलर (सुमारे 24,000 कोटी) ची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीद्वारे अदानी समूहाचे भारतातील सर्वात मोठे सिमेंट उत्पादक बनण्याचे उद्दिष्ट आहे.

Advertisement
Tags :

.