महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसऱ्या सत्रात बाजार सावरला

06:36 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 170 तर निफ्टी 90 अंकांनी तेजीत : अदानीचे समभाग मजबूत

Advertisement

मुंबई :

Advertisement

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मोठ्या नुकसानीसोबत खुले झाले होते. मात्र अंतिमक्षणी बाजारात पुन्हा तेजीचा कल पकडत बाजारात मजबूत होत बंद झाला आहे. यामध्ये व्यवहारात बँकिंग, ऑटो आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी खरेदी झाली. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 169.62 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 76,499.63 वर बंद झाले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 90.10 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 23,176.05 वर बंद झाले.

यापूर्वी, गेल्या ट्रेडिंग सत्रात दोन्ही निर्देशांक सुमारे 1.4 टक्क्यांनी घसरले. आर्थिक वाढ आणि तिसऱ्या तिमाहीतील कॉर्पोरेट निकालांबद्दलच्या चिंतेचा बाजारावर भार पडला आहे. जानेवारीमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधून 2.75 अब्ज डॉलर्स काढून घेतले असल्याची माहिती आहे. सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या 30 कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्सचा समभाग हा  5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढून बंद झाला. एनटीपीसी, झोमॅटो, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, स्टेट बँक, टाटा स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि बजाज फायनान्स यांचे वधारुन बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेकचे समबाग 9 टक्क्यांहून अधिकने प्रभावीत झाले. यासह टेक महिंद्रा, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि नेस्ले यांचे समभाग तोट्यात होते.

जागतिक बाजारपेठेत काय बिघाड आहे?

आशियाई बाजारपेठेत संमिश्र परिणाम दिसून येत आहेत. दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट वाढून बंद झाला तर जपानचा निक्केई तोट्यात होता.

क्षेत्रीय निर्देशांक असा

निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 4.20 टक्क्यांनी वाढून 6,145 वर बंद झाला, तर निफ्टी धातू निर्देशांक 3.98 टक्क्यांनी वधारुन 8,268 वर बंद झाला. निफ्टी ऑटो 2.01 टक्कयांनी ने वाढून 22,833 वर बंद झाला. बँक निफ्टी 1.43 टक्कयांनी  ने वाढून 48,729 वर बंद झाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article