महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग पाचव्या सत्रात बाजारात घसरणीची नोंद

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

सेन्सेक्स 617 तर निफ्टी निर्देशांक 216 अंकांनी प्रभावीत

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

जागतिक बाजारातील घसरणीच्या दरम्यान व लोकसभा निवडणुकीचा निकाल सादर होण्याच्या अगोदर भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझडीचे सत्र राहिलेले आहे. यामध्ये मागील सलगची पाच सत्रे ही प्रभावीत होत बंद झाली आहेत. मुख्य कंपन्यांसोबत जागतिक पातळीवरील स्थितीचाही यामध्ये परिणाम झालेला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसोबत सुरु झाला होता. परंतु बाजार बंद होताना, सेन्सेक्स 617.30 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,885.60 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 216.05 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 22,488.65 वर बंद झाला.

या कंपन्यांमध्ये राहिली घसरण :

गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक नुकसानीत टाटा स्टीलचे समभाग 5.84 टक्क्यांसह राहिले होते. यासोबतच टायटन, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रिड कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि मारुती सुझुकीसह अन्य 23 कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. तर आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, कोटक महिंद्रा आणि भारती एअरटेल यांचे समभाग वधारुन बंद झाले.

.......यामुळे घसरण ...

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia