टाटा स्टील पोलाद क्षेत्रातील चौथी मोठी कंपनी
टीसीएस अग्रस्थानावर : 1.87 लाख कोटींवर पोहचले मूल्य
वृत्तसंस्था/कोलकाता
पोलाद क्षेत्रातील चौथी मोठी कंपनी म्हणून टाटा स्टील उदयाला आली आहे. टाटा समुहातील बाजारभांडवल मूल्याच्या कामगिरीत टाटा स्टीलने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कंपनीने असे करताना आपल्याच समुहातील ट्रेंट या कंपनीला मागे टाकले आहे. या बातमीनंतर शेअरबाजारात टाटा स्टीलच्या समभागांनी 3 टक्क्यांची तेजी दर्शविली होती. यानंतर टाटा स्टीलचे बाजारभांडवल मूल्य वाढीसोबत 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे वर्षाभरामध्ये 30 टक्क्यांची घसरण अनुभवणाऱ्या ट्रेंट या कंपनीचे बाजारभांडवल मूल्य 1.80 लाख कोटी रुपयांवर घसरले.
इतर यादीतील कंपन्या
टाटा समुहाच्या आघाडीवरच्या कंपन्यांच्या यादीमध्ये आघाडीवर टीसीएस ही कंपनी राहिली आहे. यानंतर टायटन, टाटा मोटर्स या कंपन्यांचा नंबर लागतो. यानंतर चौथ्या क्रमांकावर अर्थातच पोलाद क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टील राहिली आहे. यानंतर समुहातील टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स, टाटा कंझ्युमर प्रोडक्टस, वोल्टास, टाटा कम्युनिकेशन, टाटा इएलएक्सआय आणि टाटा टेक्नॉलॉजीस यांचा नंबर लागतो.