आयुष्याच्या जोडीदारासाठी भरतो बाजार
विवाह जमविण्यासाठी येतात लोक
पूर्वीच्या काळात लोक स्वत:चे नातेवाईक, ओळखीच्या लोकांशी चर्चा करून एखाद्यासाठी जोडीदार शोधायचे. परंतु लोकांचा समाजाशी असलेला संपर्क तुटत चालला आहे. याचमुळे विवाहासाठी लोक ऑनलाइन वेबसाइट्सची मदत घेत आहेत. तर चीनमध्ये जोडीदाराचा शोध एका पार्कमध्ये घेतला जातोय. चीनच्या चेंगडु पार्कमध्ये लोक स्वत:च्या अपत्यांसाठी परफेक्ट जोडीदार शोधण्यासाठी येतात, येथे युवती आणि युवतींचा बायोडाटा टांगलेला दिसून येतो. स्वत:च्या गरजेनुसार लोक जोडीदाराची निवड करत असतात.
रेनमिन गोगयुआन असे या पार्कचे नाव असून याला चेंगडुचे पीपल पार्कही म्हटले जाते. या पार्कमध्ये अनेक लोकांची नाती जोडली गेली आहेत. येथे युवती आणि युवकांच्या प्रोफाइलला कागदावर प्रिंट करत लाकडाच्या स्तंभाशी बांधले जाते. गुलाबी कागदावर युवतींची प्रोफाइल तर निळ्या रंगाच्या कागदा युवकांची प्रोफाइल असते. आईवडिल येथे येत अपत्यांसाठी योग्य जोडीदाराचा शोध घेतात. आतापर्यंत या पार्कमध्ये अनेक लोकांचे विवाह ठरले आहेत.
या बायोडाटात प्रत्येक तपशील दिला जातो. यात वर आणि वधूचे छायाचित्रही असते. हा बायोडाटा वाचून तो पसंत पडल्यास नमूद क्रमांकावर संपर्क करत बोलणी केली जाते. चीनमध्ये या पार्कची क्रेझ वाढत चालली आहे. दरदिनी येथे लोकांची गर्दी वाढत आहे. चीनचे युवा स्वत:चा जॉब आणि कारकीर्दीत इतके व्यग्र झाले आहेत की, त्यांच्याकडे विवाहासाठी जोडीदार शोधण्यासाठीही वेळ नाही. अशा स्थितीत त्यांचे पालकच त्यांच्यासाठी जोडीदार शोधत आहेत.