For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होळीसाठी बाजारपेठ बहरली

10:43 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
होळीसाठी बाजारपेठ बहरली
Advertisement

विविध साहित्य दाखल : टिमक्या-रंगांचे बालचमूंना आकर्षण

Advertisement

बेळगाव : होळी-धूलिवंदनाचा सण अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात होळीचे साहित्य दाखल झाले आहे. विशेषत: पिचकाऱ्या, विविध रंग, मास्क, टिमक्या साहित्यांनी बाजारपेठ बहरू लागली आहे. त्याचबरोबर लहान बालकांना आकर्षित करणाऱ्या पिचकाऱ्या आणि विविध मास्कही दिसू लागले आहेत. होळीचा सण जसजसा जवळ येत आहे तसतशी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. सणासाठी गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, पिवळा यासह नैसर्गिक रंगांची आवक वाढली आहे. शहरातील पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी विविध रंगही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. साधारण 25 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत रंग उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विविध आकारातील मास्कही खरेदी केले जात आहेत. टिमक्या 35 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्लास्टिकचे ताशे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बालचमूंचे आकर्षण वाढू लागले आहे. मात्र, धूलिवंदनदिवशीच दहावीचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचतानाही विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. बाजारात विविध आकाराच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. बालचमूंना आकर्षित करतील अशा विविध रंगांमध्ये पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 25 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत त्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर छोट्या भीमच्या पिचकाऱ्याही आकर्षण ठरू लागल्या आहेत. अलीकडे पावडर रंगांचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे बाजारात 25 किलोच्या पावडर बॅग उपलब्ध आहेत. भगवा, हिरवा आणि इतर रंगांमध्ये पावडर विक्री केली जात आहे. विशेषत: ग्रामीण भागात या पावडरची विक्री अधिक होणार आहे. त्यामुळे खरेदीची लगबग बाजारात पाहावयास मिळत आहे.

रासायनिक रंगांचा वापर हानिकारक

Advertisement

शरीराला हानिकारक असणाऱ्या रासायनिक रंगांचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे त्वचा आणि डोळ्यांना इजा पोहोचू लागली आहे. या रंगांमुळे अनेकांच्या त्वचेवरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे या रंगांचा वापर होऊ नये, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.