महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मालीवाल प्रकरण ‘आप’ला भोवणार

06:21 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना प्रत्यक्ष मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरातच मारहाण झाली आहे. या घटनेमुळे दिल्लीची जनता प्रक्षुब्ध झाली असून हे प्रकरण आम आदमी पक्षाला चांगलेच भोवणार आहे. या पक्षाचा मोठा पराभव निश्चित झाला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिल्लीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले आहे. 13 मे या दिवशी स्वाती मालीवाल यांना मारहाण झाली होती, असा आरोप त्यांनी स्वत: केला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांना अटक करण्यात आली असून त्यांची कोठडीत पाठवणी करण्यात आली आहे.

Advertisement

विभव कुमार यांनी आपल्याला सात आठ वेळा थपडा मारल्या, असा आरोप मालीवाल यांनी केला असून त्यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल घरातच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण सध्या तापले असून आम आदमी पक्ष त्यामुळे बॅकफूटवर गेल्याचे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे. नेहमी इतरांना नैतिकतेचा उपदेश करणारे केजरीवाल या प्रकरणात मात्र मूग गिळून गप्प आहेत. यावरुन काय घडले असावे याची  स्पष्ट कल्पना येते, अशी टीका भाटिया यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article