For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीत आजपासून चित्रपटांची जादू

10:44 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पणजीत आजपासून चित्रपटांची जादू
Advertisement

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ : ऑस्ट्रेलियाच्या ‘बेटर मॅन’चे प्रथम प्रदर्शन

Advertisement

पणजी : गोव्यात आज बुधवारपासून 28 नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकल गसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने होणार आहे. आंचिमचा उद्घाटन सोहळा आज बुधवारी सायंकाळी 5 वा. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर दिग्गजांच्या उपस्थितीत होणार आहे.  सिनेमॅटिक दिग्गजांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमांची अविस्मरणीय संध्याकाळ रंगणार आहे. अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर सोहळ्याचे सूत्रसंचालन करतील. समारंभात सुभाष घई,  दिनेश विजन, अमर कौशिक, एन. एम. सुरेश, आर. के. सेलवामणी, इशारी गणेशन, रवी कोटारा करा, आणि गीतकार प्रसून जोशी उपस्थित राहतील. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन, नित्या मेनन, आमला, विक्रांत मसी, रकुल प्रीत, मानुषी  छिल्लर, राजकुमार राव, बोमन ईराणी, जयदीप अहलावत, रणदीप हुडा, सानिया मल्होत्रा, जयम रवी, जॅकी भगनानी, आर. सारथ कुमार, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, राधाकृष्ण परतीबान आदी कलाकारांची उपस्थिती या महोत्सवात लाभेल. इतर दिग्गज कलाकारांसोबत श्री श्री रविशंकर हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.  यात  रविशंकर हे आपल्या विशेष भाषणाने उपस्थितांना प्रेरित करतील.

ऑस्टेलियन चित्रपटांची मेजवानी

Advertisement

यंदाच्या इफ्फीमध्ये ऑस्ट्रेलियाला फोकसचा देश म्हणून दाखवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन फर्स्ट नेशन्स नृत्य गट, जानवी डान्स क्लॅन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणारा एक आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करेल. उद्घाटन सोहळ्याची सुऊवात चित्तथरारक सादरीकरणाने होईल. ज्यामध्ये भारताच्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचे प्रदर्शन होईल. भारतीय संस्कृतीचे आध्यात्मिक सार प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

अनेकांना काव्यात्मक श्रद्धांजली

‘टाइमलेस सोल्स’ ही काव्यात्मक श्रद्धांजली राज कपूर, एएनआर आणि मोहम्मद रफी सारख्या सिनेमॅटिक दिग्गजांना व्हिज्युअल, संगीतद्वारे सन्मानित करेल. या समारंभात भारतीय सिनेमाच्या उक्रांतीवर प्रकाश टाकला जाईल, जो प्रेक्षकांना मूक युगापासून आधुनिक सिनेमॅटिक उत्कृष्ट कृतींपर्यंतच्या प्रवासास घेऊन जाईल. महोत्सवात विविधता आणि सर्वसमावेशकता यांचाही संदेश दिला जाणार आहे. कारण यामध्ये महिलांनी दिग्दर्शित केलेले 47 चित्रपट आणि तऊण आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांचे 66 चित्रपट यांचाही समावेश आहे. दबलेल्या आवाजांकडे विशेष लक्ष देण्याची महोत्सवाची वचनबद्धता यातून दिसून येते. ‘द विमेन इन सिनेमा’ या महिला विभागात उदयोन्मुख प्रतिभावान  महिला चित्रपट निर्मात्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर हे चित्रपट प्रकाश टाकतील. ए.आर. रहमान, प्रसून जोशी, शबाना आझमी, मणिरत्नम, विधू विनोद चोप्रा या दिग्गजांसोबत  फिलिप नॉयस आणि जॉन सील यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या नेतृत्वाखाली कला अकादमीमध्ये 25 हून अधिक मास्टरक्लास आणि चर्चासत्रे याचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.

हा चित्रपट महोत्सव सर्व चित्रपट रसिकांसाठी, विशेषत: दिव्यांग लोकांसह, सर्व रसिकांसाठी  प्रवेशसुगम आहे याची खात्री करण्यासाठी, इफ्फीने ’स्वयम्’ या अग्रगण्य संस्थेला प्रवेशसुगमता भागीदार म्हणून नेमले आहे. इफ्फी 2024 सर्वसमावेशकतेसाठी वचनबद्ध असून त्यात, सर्व ठिकाणे सुलभपणे प्रवेश करण्यासाठी सुयोग्य बनवली  आहेत, तसेच स्वयंसेवकांना  दिव्यांगांबद्दल संवेदनशील करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास’ च्या भावनेला मूर्त स्वऊप देत इफ्फीमधील सर्व चित्रपट, कार्यक्रम आणि  उपक्रमांचे वर्णन श्राव्य पद्धतीने ऐकण्यासाठी आणि सांकेतिक भाषेतील स्पष्टीकरणांसह तसेच, ऍप्लिकेशन्सच्या वापराद्वारे यातील सुगमता सुनिश्चित करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ‘बेटर मॅन’ चा प्रीमियर

उद्घाटन सोहळ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी दिग्दर्शित ’बेटर मॅन’ या ओपनिंग फिल्मच्या रेड-कार्पेट प्रीमियरसह, आयनॉक्स पणजी येथे दुपारी 2 वा.पासून प्रीमियरला सुऊवात होईल. चित्रपट प्रीमियरच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुऊगन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच बेटर मॅन चित्रपटाचे कलाकारदेखील यावेळी उपस्थित राहतील.

Advertisement
Tags :

.