महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात सुदैवी व्यक्ती

06:06 AM Oct 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

7 वेळा मृत्यूला दिला चकवा, मग बंपर लॉटरी जिंकली

Advertisement

क्रोएशियाच्या एका व्यक्तीला जगातील सर्वात सुदैवी व्यक्ती मानले जाते. फ्रॅन सेलाक नावाच्या या इसमाचे जीवन एखाद्या चित्रपटाच्या कहाणीपेक्षा अधिक अॅडव्हेचरस आहे. फ्रैनचे जीवन थक्क करणाऱ्या घटनांनी व्यापलेले होते. सातवेळा मृत्यू त्याच्यासमोर येऊन ठेपला होता, परंतु दरवेळी त्याने मृत्यूला चकवा दिला. यानंतर त्याने एक बंपर लॉटरीही जिंकली. 1929 मध्ये क्रोएशियात जन्मलेले फ्रैन पेशाने संगीत शिक्षक होता. त्याचे जीवन अत्यंत साधारण होते. परंतु एका बस दुर्घटनेनंतर त्याच्या रोमांचक जीवनाची सुरुवात झाली.

Advertisement

फ्रॅन सेलाक क्रोएशियातच राहायचा आणि 30 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी त्याचे निधन झाले होते. परंतु त्यापूर्वी त्याने अनेकदा मृत्यूचा सामना केला होता. पहिल्यांदा 1957 मध्ये एका प्रवासादरम्यान बसमधून तो नदीत कोसळला, या दुर्घटनेतून तो बचावला. यानंतर एका दुर्घटनेत रेल्वे रुळावरून घसरत नदीत कोसळली होती. या दुर्घटनेतूनही तो सुखरुप बचावला होता. मग एकेदिवशी एका विमान दुर्घटनेतूनही तो बचावला, विमान कोसळताना फ्रैन एका गवताच्या गंजीवर पडला होता. यानंतर एका पर्वतावरून पडल्यावर एका वृक्षाने त्याचा जीव वाचविला होता. तसेच एका बसच्या धडकेपासून तो बचावला होता.

मग जणून जातील सर्वात सुदैवी व्यक्ती असल्याचे सिद्ध करण्याकरताच फ्रैनने लॉटरीत सुमारे 1 दशलक्ष डॉलर्सची रक्कम मिळविली होती. या रकमेतील बहुतांश हिस्सा त्याने मित्र आणि परिवाराला दिला. मग स्वत:साठी एक आलिशान घर खरेदी केले परंतु 2010 मध्ये त्याचे मनपरिवर्तन झाले आणि ते त्याने विकून टाकले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article