कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगातील सर्वात लांब जीभ

06:36 AM Apr 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅलिफोर्नियाच्या महिलेने रचला इतिहास

Advertisement

जगभरात लोक वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे विश्वविक्रम नोंदवत असतात. कुणी पाण्यात दीर्घकाळ श्वास रोखण्याचा विक्रम करतो, तर कुणी सर्वात लांब नखांचा विक्रम स्वत:च्या नावावर करत असतो. आता कॅलिफोर्नियातील एका महिलेने स्वत:च्या 9.75 सेंटीमीटर लांब जिभेसह गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. तिची जीभ एका आयफोनइतकी लांब आहे.

Advertisement

कॅलिफेर्नियातील विद्यार्थिनी चॅनल टॅपरने महिलांमध्ये आतापर्यंतची सर्वात लांब जीभ असण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. तिच्या जिभेची लांबी 9.75 सेंटीमीटर आहे. या अनोख्या रचनेमुळे तिला आता मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. सर्वात लांब जीभ असण्याबद्दल मला सर्वप्रथम वयाच्या 8 व्या वर्षी कळले होते. स्वत:च्या आईसोबत हॅलोवीन फोटोसेशन करवित असताना हे घडले होते. हॅलेवीनचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर माझी जीभ असाधारण स्वरुपात लांब असल्याचे कळले, असे टॅपरने सांगितले आहे.

टॅपर स्वत:च्या लांब जीभेवरू मिळणाऱ्या मजेशीर आणि चकित करणाऱ्या प्रतिक्रियांचा आनंद घेते. लोक माझी जीभ पाहून थक्क होत असल्याचे पाहणे मला आवडते. कधीकधी काही लोक घाबरून ओरडतात, असे ती सांगते. तिच्या विक्रमी जिभेने इंटरनेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेअर केला असून तो व्हायरल देखील झाला आहे.

सर्वात लांब जीभ असलेला पुरुष

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार अमेरिकेतील निक स्टोएबरल या इसमाच्या नावावर सर्वात लांब (पुरुष) जीभ असण्याचा विक्रम आहे. निक स्टोएबरल यांच्या जिभेची लांबी 10.1 सेंटीमीटर आहे.  निकची जीभ इतकी लांब आहे की, तो स्वत:चा कोपरा देखील चाटू शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article