सावंतवाडीत परप्रांतीय मुकादमांच्या स्थानिक टेम्पोचालकांनी अडवल्या गाड्या
सावंतवाडी टेम्पो चालक-मालक असोसिएशन आक्रमक ; काय प्रकरण ?
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात परप्रांतीय मुकादम आपलीच वाहने वापरून व्यवसाय करत आहेत. त्यामुळे स्थानिक टेम्पो वाहतूक करणाऱ्या चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ट्रान्सपोर्ट करणाऱ्या परप्रांतीय मुकादमाच्या विरोधात आज सकाळ पासून सावंतवाडी टेम्पो चालक-मालक असोसिएशनने सावंतवाडी गवळी तिठा येथे २० मुकादमांच्या वाहनांना रोखले आणि पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची वाहने ताब्यात दिली. त्यातील जवळपास तीन वाहनांना कुठलाही परवाना नाही. विना पासिंगच्या गाड्यांद्वारे ते वाहतूक करत आहेत. त्यामुळे हे टेम्पो चालक-मालक अधिक आक्रमक झाले आहेत . स्थानिक टेम्पोचालकांकडे पोलीस गाड्यांचे पासिंग मागतात आणि परप्रांतीयांना मात्र पाठीशी घालत आशीर्वाद देतात असा स्थानिक टेम्पोचालकांचा आरोप आहे .परप्रांतीय मुकादमांना पाठीशी कोण घालत आहे असा सवाल टेम्पो चालक- मालक असोसिएशनचे अध्यक्ष राजू वाळके ,सतीश नार्वेकर आदींनी केला आहे . परप्रांतीय लोक ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. काल स्थानिक टेम्पो चालक-मालक आणि परप्रांतीय टेम्पो चालक यांच्यात बैठक झाली. परंतु, त्या बैठकीत झालेली चर्चा निष्फळ झाली. त्यामुळे आज सकाळी गाड्या रोखण्यात आल्या.
स्थानिक टेम्पो चालक-मालक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. परप्रांतीय मुकादम जो पर्यंत आपला ट्रान्सपोर्ट व्यवसाय बंद करत नाही तो पर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. या संदर्भात दोन्ही बाजू जाणून घेण्यासाठी काल उशिरा दोन्ही गटात बैठक घेण्यात आली. परंतु ,ती निष्फळ ठरली. त्यामुळे आज सकाळी टेम्पो चालक मालकांनी गाड्या अडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी गाड्या अडविण्यात आल्या. यात त्या गाड्यांची कागदपत्रे, टॅक्स अशा गोष्टी अपूर्ण असल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे. त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांना रोखण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
यावेळी अध्यक्ष राजू वाळके विशाल सावंत, वाळके, सतिश नार्वेकर, आनंद मिशाळ, मिथिल सुभेदार, राजु गोवेकर, कादर बेग, आनंद वेरेकर, निलेश पेडणेकर, महेश गावडे, धाकू शेळके, जमीर शेख, महेश सबनीस, गणेश वेंगुर्लेकर, मुबिन बेग, कृष्णा राऊळ, प्रविण सावंत, विठ्ठल गुरव, विनोद राऊळ, गणपत टिळवे, रॉबर्ट फर्नांडिस, विजय धुरी, अभिजीत भोगण, राजन ठाकुर, शशिकांत धुरी, रविंद्र राऊळ, राहुल वरक, उमेश डाफळे, रफिक बेग, योगेश वरक, सागर परब हेमचंद्र सावळ कादार बे ग आनंद वेर्लेकर रुपेश सावंत नितेश पेडणेकर येथील सुभेदार सुशील बावकर सुरेश राऊत जमीर शेख थॉमर्स फर्नांडिस.उमेश तेली, आनंद पडते, प्रकाश राऊळ, रामदास कासार, रघुनाथ खोटलेकर, रुपेश सावंत, राजू वाळके, मयूर सुभेदार, कृष्णा राऊळ, सचिन कानसे, मितेश पेडणेकर, अदनान शहा, उत्तम सावंत, अल्बर्ट डिसोझा, सुशील भावे, नरेंद्र माळकर, थॉमस पिंटो, सिकंदर मुजावर, विद्यानंद चीपकर, प्रकाश राऊळ, महेश सावंत, बाळू सावळ, विजय धुरी निखिल सुभेदार सुशील बावकर सुरेश राऊत जमीर शेख थॉमर्स फर्नांडिस आनंद वेर्लेकर नितेश पेडणेकर आदी उपस्थित होते.