For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हद्दच झाली! केवळ एक रुपयाचा प्राप्तिकर विवाद

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
हद्दच झाली  केवळ एक रुपयाचा प्राप्तिकर विवाद
Advertisement

वाद सोडविण्यासाठी 50 हजार रुपयांचा खर्च

Advertisement

देशात अनेकदा प्राप्तिकराशी निगडित विषय समजून घेण्यास लोकांना समस्या होते. अनेकदा याच्याशी निगडित वाद इतका गुंतागुंतीचा असतो की तो समजून घेण्यासाठी लोकांना एखादा सीए किंवा वित्तीय सल्लागाराची मदत घ्यावी लागते. अनेकदा तर करभरणा रकमेपेक्षा अधिक खर्च लोकांना हा वाद सोडविण्यासाठी करावा लागत असतो. अलिकडेच दिल्लीच्या अपूर्व जैनसोबत असेच घडले आहे. जैनने सोशल मीडियावर चकित करणारा दावा केला आहे. त्याने स्वत:च्या चार्टर्ड अकौंटला जो कर विवाद सोडविण्यासाठी 50 हजार रुपयांचे शुल्क दिले तो केवळ एक रुपयाचा होता. मी थट्टा करत नसून एक रुपयासाठी हे सर्व काही घडले असल्याचे जैन याने स्वत:ची निराशा व्यक्त करत म्हटले आहे.

ही घटना भारतातील प्राप्तिकर व्यवस्थेतील जटिलता दर्शविते, जेथे किरकोळ मुद्द्यांकरता मोठी रक्कम खर्च करावी लागते. जैन यांच्या प्रकरणी सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. काही युजर्सनी प्राप्तिकर विभागाच्या अक्षमतेवर निशाणा साधला तर अनेकांनी वित्तीय तज्ञांच्या शुल्करचनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्राप्तिकर विभागाची स्थिती अशी आहे की आता काहीच थट्टेसारखे वाटत नसल्याचे एका युजरने म्हटले आहे. प्राप्तिकर विभाग श्रीमंत शेतकऱ्यांना नोटीस पाठवेल त्या दिवसाची मी वाट बघत असल्याचे एका अन्य युजरने नमूद केले. याचदरम्यान प्राप्तिकर विभागाने करदात्यांकरता एक सल्ला जारी केला आहे, ज्यात सवलत आणि कपातीसाठी खोट्या दाव्यांसोबत प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी दंड तसेच तुरुंगवासही होऊ शकतो असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.