For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शेणा’च्या घड्याळाला जगभर मागणी

06:02 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘शेणा’च्या घड्याळाला जगभर मागणी
Advertisement

जनावरांचे शेण ही टाकावू वस्तू मानण्याची पद्धत आहे. त्यातल्या त्यात गाईच्या  शेणाला महत्व आहे. दूध देणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या शेणाचा उपयोग इंधन आणि शेणखत तयार करण्यासाठी होतो. पण अलिकडच्या काळात गाईच्या शेणाचे महत्व अधिकच वाढले आहे. या शेणापासून अनेक वस्तू निर्माण केल्या जात आहेत आणि अशा वस्तूंना ग्राहकही मोठ्या प्रमाणात मिळताना दिसून येतात.

Advertisement

गाईच्या शेणापासून अलिकडच्या काळात निर्माण करण्यात आलेली अद्भूत वस्तू चक्क ‘घड्याळ’ ही आहे. हे शोभेचे घड्याळ नाही, तर प्रत्यक्ष अचूकपणे दाखविणारे आहे. भारतातील काही कल्पक महिलांनी ही निर्मिती केली असून दिला अमेरिका आणि युरोपमधूनही मागणी येत आहे. मध्यप्रदेश राज्यातील सागर जिल्ह्यातील एका स्वयंसाहाय्य महिला गटाने या घड्याळाची रचना केली आहे. या गटाचे नाव ‘विचार समिती’ असे असून सुनीता जैन अरिहंत या आहेत.

हा महिला गट गाईच्या शेणापासून विविध वस्तू निर्माण करतो. शेणाच्या घड्याळाची निर्मिती करण्याची कल्पना या गटाने साकारली आहे. यंदाच्या दिवाळीत अशी 5 हजार घड्याळे निर्माण करण्यात येणार असून त्यांच्यापैकी 90 टक्के घड्याळांची निर्मिती करण्यातही आली आहे. अशी काही घड्याळे यंदा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये निर्यात करण्यात आली. या घड्याळांच्या आतील यंत्रणा अर्थातच धातूची आहे. मात्र घड्याळाची चौकट किंवा फ्रेम गाईच्या शेणावर प्रक्रिया करुन निर्माण केलेल्या वस्तूची आहे. ही घड्याळे पर्यावरणस्नेही असून त्यांची किंमत वाजवी आहे. या महिला गटाच्या या कल्पकतेचे कौतुक केवळ पंचक्रोशीतच नव्हे, तर आता जगभर होऊ लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.