Satara : पांगारी - भोसे परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद
महाबळेश्वर तालुक्यात वन विभागाचे यश; बिबट्या पिंजऱ्यात
भिलार : गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे परिसरात बिबट्याचा वावर लक्षणीयरित्या वाढला होता. बिबट्याच्या सततच्या हालचालीमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बन विभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या. वन विभागाने भोसे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्री बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
वन विभागाने बिबट्याच्या संभाव्य धोक्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये बारंबार जनजागृती केली. तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त देखील सुरू केली होती. वन विभागाच्या या प्रयत्नांना बुधवारी अखेर मोठे यश मिळाले आहे. बन विभागाने भोसे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी बन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ही मोहीम उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बनक्षेत्रपाल म. ह. मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पार पडली . बिबट्याला पिंजरा बंद करण्याच्या कामात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग घेतला.
वन परिमंडल अधिकारी, गुरेघर आर व्ही. काकडे, वनरक्षक, मेटगुताड तानाजी केलगणे, वनरक्षक, गुरेधर बी. सी. जावीर, कायवन मजूर, गुरेघर संजय भिलारे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्या बुधवारी पकडला. यावेळी राम गोळे, राहुल गोळे, तुषार गोळे, विजय गोळे, आदित्य गोळे, लखन गोळे, सौरव गोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या जेरबंद केलेल्या बिबट्याला सुरक्षितस्थळी हलवण्याची पुढील कार्यवाही वन विभागाकडून सुरू आहे. वन विभागाच्या या तत्परतेमुळे ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले आहेत.