महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्वात मोठे खासगी जेट

06:26 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुविधा जाणून घेतल्यावर व्हाल थक्क

Advertisement

जगातील सर्वात मोठ्या खासगी जेटला ‘फ्लाइंग मेंशन’ नाव देण्यात आले आहे. हे विमान अत्यंत सुंदर असून इकोनॉमी क्लासकरता तुम्ही अधिक आनंदी नसाल तर हे लक्झरी बोइंग 747-8 जेट तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. यात अनेक बेडरुम्स, डायनिंग रुम आणि मास्टर सुइट देखील आहे. याचबरोबर लोकांच्या खासगीत्वाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. हे रुम्स विमानाच्या कॉकपिटनजीक असूनही यात इंजिन्सचा आवाज ऐकू येत नाही.

Advertisement

या विमानातील खोल्यांना विशेषप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे. यात मध्यवर्ती बेड ठेवण्यात आला असून सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. इंटीरियरचा रंग देखील सोन्याच्या महालासारखी अनुभूती व्हावी असा देण्यात आला आहे. तर बाथरुम्सला काचांनी व्यापण्यात आले आहे. फनिर्शिंग लाकडी असून त्यावर सोन्याची अनुभूती करणारा रंग देण्यात आला आहे.

मास्टर बेडरुमपासून लिव्हिंग एरियापर्यंत जाण्यासाठी गोल्डन पायऱ्या आहेत. तेथे सोफा असून भिंतीवर आर्टवर्क करण्यात आले आहे.  पूर्ण विमानात खास लाकडाचा वापर करण्यात आला आहे. जेटमध्ये ड्रिंक्स अणि गेम्सची देखील व्यवस्था आहे. बोइंग 747-8 ने पहिल्यांदा नोव्हेंबर 2005 मध्ये उड्डाण केले होते. त्यावेळी या विमानात एकावेळी 467 प्रवासी सामावू शकत होते. आता इतक्या सुविधा असल्यावर कोण या खासगी जेटमधून प्रवास करू इच्छिणार नाही? परंतु याकरता भरभक्कम रक्कम खर्च करावी लागणार आहे. हे जेट रियल इस्टेट जोसेफ लाउ यांच्याकडे आहे. त्यांची एकूण संपत्ती 10.3 अब्ज पाउंडपेक्षा अधिक असल्याचे मानले जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article