For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur: पंढरपूरात उभं राहतंय राज्यातील सर्वात मोठं नामसंकीर्तन सभागृह ; उपमुख्यमंत्री शिंदेंकडे निधीची मागणी

05:25 PM Nov 03, 2025 IST | NEETA POTDAR
solapur  पंढरपूरात उभं राहतंय राज्यातील सर्वात मोठं नामसंकीर्तन सभागृह    उपमुख्यमंत्री शिंदेंकडे निधीची मागणी
Advertisement

                      पंढरपूरात उभं राहतंय भव्य नामसंकीर्तन सभागृह

Advertisement

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील एक सुंदर वास्तु असलेल्या पंढरपूर नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्यात आले आहे. यासाठी २० कोटी रुपये निधीची मागणी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली आहे.

राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम वर्षभर होत असतात. यासाठी येथे भव्य नामसंकीर्तन सभागृह उभा करावे, अशी मागणी माजी आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन या कामास मंजुरी देण्यात आली. पंढरपूर शहरात नामसंकीर्तन सभागृहास महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली होती. या कामाची एकूण अंदाज पंढरपूर उपमुख्यमंत्री शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देताना माजी आमदार प्रशांत परिचारक. पत्रकीय किंमत ३९.४७ कोटी होती. आतापर्यंत २५ कोटी इतका निधी पंढरपूर नगरपरिषदेस प्राप्त झालेला आहे. प्राप्त झालेल्या निधीतून झालेल्या कामाची बिले देण्यात आलेली आहेत.

Advertisement

सध्याच्या कामाच्या अंदाज पत्रकामध्ये बाढ झाली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील बॉल कंपाऊंड, प्लंम्बिंग, अग्निशमन व विद्युत इ. काम ७० टक्के काम पूर्ण झालेले आहे. तिसऱ्या टप्यातील नामसंकीर्तन सभागृहाचे अंतर्गत रस्ते, भूखंड विकास अंतर्गत रस्ते सुधारणा, फर्निचर व्यवस्था, बिद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सौरऊर्जा कामे व रोहित्र स्थलांतरण इ. कामे करण्याची असून यासाठी २० कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी प्रशांतराव परिचारक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली असून याबाबतचे निवेदन त्यांना दिले आहे. या मागणीबाबत उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हा निधी मंजूर होईल.

Advertisement
Tags :

.