महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्खननात मिळाली सर्वात मोठी सामूहिक दफनभूमी

06:26 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1 हजार सांगाड्यांच्या रहस्याची वैज्ञानिकांनी केली उकल

Advertisement

जगातील अनेक देशांमध्ये प्राचीन स्थळी उत्खननाचे काम सुरू असते. यादरम्यान अनेक थक्क करणारे शोध लागत असतात. अशाच प्रकारचा शोध जर्मनीच्या न्यूरेमबर्गमध्ये लागला आहे. येथे एक सामूहिक दफनभूमी सापडली असून येथे आता रिटायरमेंट होम तयार केले जात आहे. याचकरता तेथे खोदकाम सुरू होते. परंतु आता तेथे किमान 1 हजार सांगाडे सापडले आहेत. न्यूरेमबर्ग शहरायच मध्यवर्ती ठिकाणी सामूहिक दफनभूमीत मिळालेले हे सांगाडे प्लेगग्रस्तेंचे आहेत. या दफनभूमीत एकूण 1500 पेक्षा अधिक लोकांना एकत्रितपणे पुरण्यात आले असावे असे पुरातत्व तज्ञांचे मानणे आहे.

Advertisement

येथील थडगं किती जुने आहे याचा अद्याप शोध लागलेला नाही. परंतु हे 17 व्या शतकातील असल्याचे मानले जात आहे. काही हाडांचा रंग हिरवा झाल्याचे आढळून आले आहे. नजीक असलेल्या तांब्याच्या कारखान्याचा कचरा येथे टाकला जात होता, यामुळे हा रंग प्राप्त झाला असावा असे तर्क दिला जात आहे.

आम्ही भविष्यात निर्मितीक्षेत्रांमध्ये आढळून येणाऱ्या सर्व मानवी अवशेषांना सुरक्षित अणि संग्रहित करणार आहोत. सध्या एकदा हे काम पूर्ण झाल्यावर युरोपमध्ये शोधण्यात आलेला प्लेगग्रस्तांची सर्वात मोठी आपत्कालीन दफनभूमी म्हणून याला मानले जाईल असे उद्गार न्यूरेमबर्ग हेरिटेज कनजर्वेशन डिपार्टमेंटच्या पुरातत्व तज्ञ मेलानी लँगबीन आणि मुख्य मानवशास्त्रज्ञ फ्लोरियन मेल्जर यांनी काढले आहेत.

ब्लॅक डेथ आणि जस्टिनियन प्लेग यासारख्या विनाशकारी महामारीसाठी बुबोनिक प्लेगला जबाबदार मानले जाते. ब्लॅक डेथनंतर न्यूरेमबर्ग सारखी शहरे मोठ्या प्रमाणात प्रभावित झली होती. न्यूरेमबर्गमध्ये प्लेगमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांना ख्रिश्चन पद्धतीनुसार दफन करण्यात आले नव्हते. रुग्णांना घाईगडबडीत दफन करण्यात आले होते. या लोकांच्या मृत्यूची स्थिती समजून घेण्यासोबत या अवशेषांच्या अध्ययनातून न्यूरेमबर्गच्या इतिहासाविषयी खूप काही कळणार असल्याचे पुरातत्व तज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article