For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुद्धांची दगडात कोरलेली सर्वात मोठी मूर्ती

06:37 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बुद्धांची दगडात कोरलेली सर्वात मोठी मूर्ती
Advertisement

हजारो वर्षे जुन्या अनोख्या इंजिनियरिंगचे उदाहरण

Advertisement

लेशान विशालकाय बुद्ध पुतळा प्राचीन इंजिनियरिंग आणि कलात्मकतेचा एक चमत्कार आहे. चीनच्या तांग राजघराण्यादरम्यान सरळ एका खडकावर चेहरा कोरण्यात आला. ही विशाल मूर्ती एक हजार वर्षापेक्षा अधिक काळापासून तीन नद्यांच्या संगमावर नजर ठेवून आहे. 71 मीटर उंच ही जगातील सर्वात मोठा दगडी बुद्ध मूर्ती आहे. अनेकार्थाने ही मूर्ती जगभरातील लोकांना आकर्षित करते.

लेशानची विशालकाय बुद्ध मुर्ती प्राचीन चिनी शिल्पकला आणि अध्यात्मिकतेचा पुरावा आहे. खडकावर कोरण्यात आलेली ही विशाल मूर्ती शतकांपासून पर्यटकांना आकर्षित करत राहिली आहे. ही मूर्ती 71 मीटर उंच असून यांचे खांदे 28 मीटर रुंद आहेत. बुद्धाचे शीरच 14.7 मीटर उंच आणि 10 मीटर रुंद आहे. प्रत्येक कान 7 मीटर लांब आहे.

Advertisement

लेशान ही मूर्ती केवळ कलेचा नमुना नसून भक्ती आणि इंजिनियरिंग कौशल्याचा मिलाप आहे. बुद्धाची ही मूर्ती तांग राजवंशादरम्यान कोरण्यात आली होती. याचे काम 618 ते 907 ईसवी सनापर्यंत चालले. या मूर्तीचे काम टोंग नावाच्या एका चिनी भिक्षूने हाती घेतली होते. बुद्ध खालून वाहणाऱ्या नद्यांच्या अशांत पाण्याला शांत करतील अशी त्याला अपेक्षा होती.

लेशान विशालकाय बुद्ध मूर्ती पर्यावरणाचा विचार करत तयार करण्यात आली होती. नैसर्गिक तत्वांना हाताळण्यासाठीचे प्राचीन ज्ञान ही मूर्ती दर्शविते. मूर्तीला तीन नद्या मिन, किंगयी आणि दादूच्या संगमावर एका खडकावर कोरण्यात आले आहे. पाण्याचे नुकसान रोखण्यासाठी मूर्तीमध्ये लपलेले प्राण्यांच्या प्रवाहाची काळजी घेण्यात आली आहे. बुद्धाच्या मूर्तीच्या निर्मितीने खालून वाहणारे पाणी शांत होते, यामुळे क्षेत्रात जहाज बुडण्याची संख्या कमी होत असल्याचे मानले जाते.

ही मूर्ती मैत्रेयचे प्रतिनिधित्व करते, जे एक बोधिसत्व आहे. जो भविष्यात पूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी पृथ्वीवर प्रकट होण्याची अपेक्षा आहे. भाविक आणि पर्यटक समान स्वरुपात या स्थळावर स्वत:चा सन्मान प्रकट करणे आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी येतात. लेशान विशालकाय बुद्धमूर्तीचे संरक्षण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. या मूर्तीची झीज रोखण्यासाठी 20 व्या आणि 21 व्या शतकातही प्रयत्न झाले आहेत. 1996 मध्ये लेशान विशालकाय बुद्धमूर्तीला य gनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाले होते.

Advertisement
Tags :

.