कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेझॉनच्या जंगलात सर्वात मोठा अॅनाकोंडा

06:36 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वैज्ञानिकांच्या शोधाने जग थक्क

Advertisement

अॅनाकोंडाचे नाव ऐकताच विशाल प्रजातीचा साप असे चित्र मनात तयार होते. परंतु अॅनाकोंडामध्ये देखील अनेक प्रजाती असून त्या वैज्ञानिकांना थक्क करत असतात. अशाच एका शोधाने संशोधकांना चकित केले आहे. इक्वेडोरच्या घनदाट जंगलांमध्ये विशाल अॅनाकोंडाच्या नव्या प्रजातीचा शोध त्यांनी लावला आहे.

Advertisement

नॅशनल जियोग्राफिकसाठी अभियानावर निघालेल्या वैज्ञानिकांनी अॅनाकोंडाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. या विशाल सापाला टीमने बामेनो क्षेत्रात प्राध्यापक ब्रायन फ्राय यांच्या नेतृत्वात शोधले आहे. या अॅनाकोंडाच्या शोधाला नॅशनल जियोग्राफिक वाहिनीवर दाखविण्यात आले आहे. नॉर्दर्न ग्रीन अॅनाकोंडा (यूनेक्टेस अकायमा) नावाचा हा साप 20 फुटांपेक्षा अधिक लांब आहे. यामुळे त्याने मागील विक्रम मोडीत काढले आहे. ज्या भागात हा अॅनाकोंडा सापडला तो, बैहुआरी वाओरानी क्षेत्रात आहे. हा एक दुर्गम भाग असून तेथे यापूर्वी शोधकार्य कधी करण्यात आले नव्हते.

10 दिवसांपर्यंत जंगलात फिरली टीम

हा अॅनाकोंडा जगातील सर्वात मोठा साप असल्याचे स्थानिक समुदायाचे मानणे आहे. संशोधक आणि वाओरानी शिकाऱ्यांनी 10 दिवसांपर्यंत जंगलात याचा शोध घेतला. या दरम्यान सापाच्या शोधात या पथकाला घनदाट जंगलातील नद्यांनाही ओलांडावे लागले आहे. या टीमने अनेक अॅनाकोंडा पकडले, ज्यातील एक 20.7 फूट लांब होता, या क्षेत्रात अॅनाकोंडा 24 फूटांपेक्षाही अधिक मोठे असतात असा दावा काही वाओरानींनी केला आहे.

या विशाल अॅनाकोंडाला शोधणे सोपे नव्हते. वैज्ञानिकांना याकरता संघर्ष करावा लागला आहे. अॅनाकोंडाला उथळ पाण्यात शिकारीच्या प्रतीक्षेत पाहिले गेले होते. तज्ञांनी अनेक नमुन्यांचे अध्ययन केले, ज्यामुळे या प्रजातीच्या विशिष्टतेची पुष्टी झाली आहे. या शोधाने पुन्हा एकदा अमेझॉनचे जंगल स्वत:च्या आत अनेक रहस्य सामावून असल्याचे सिद्ध झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article