महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चीनमधील लॅडर ऑफ लव्ह

06:06 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किंचित चूक अन् खेळ खल्लास

Advertisement

प्रेम करणाऱ्यांना अनेक प्रकारच्या कसोट्यांना सामोरे जावे लागते. प्रेम निभावणे अत्यंत अवघड असते. जोडप्यांदरम्यान अशा अनेक स्थिती येतात, जेव्हा त्यांच्या प्रेमाची कसोटी लागत असते. अनेकदा तर जोडपी स्वत:हूनच प्रेमाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात. अशाच जोडप्यांसाठी चीनने एक अदभूत निर्मिती केली आहे.

Advertisement

चीनमध्ये लॅडर ऑफ लव्ह तयार करण्यात आला आहे, म्हणजेचे प्रेमाची शिडी. अत्यंत उंचीवर ही शिडी तयार करण्यात आली असून तिची निर्मिती जोडीदार परस्परांवर डोळे झाकून विश्वास ठेवत असतील तरच यावर चढाई करू शकतात अशाप्रकारे करण्यात आली आहे. अन्यथा यावर चढणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे.

लॅडर ऑफ लव्हवर चढणे सोपे काम नाही. याची निर्मिती चीनच्या हेनान प्रांतातील फुक्सी माउंटेनवर करण्यात आली आहे. 1314 मीटर उंच या जिन्यावर चढणे सोपे नाही. हा हवेत तयार करण्यात आला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला रेलिंग देखील नाही. म्हणजेच लॅडर ऑफ लव्हवरून कुणी कोसळला तर तो थेट दरीत पडणार.

या पायऱ्यांना लॅडर ऑफ लव्ह नाव देण्यामागे विशेष कारण आहे. या पायऱ्यांवर चढणे या गोष्टीला प्रमाणित करते की तुम्ही तुमच्या पार्टनरवर डोळे बंद करूनही विश्वास करू शकता. तुमच्यात विश्वास असेल तरच यावर तुम्ही चढाई करू शकता. अन्यथा येथे जोडीदाराशिवाय चढणे अशक्य आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article