For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारागृहातील अदृश्य यंत्रणा शोधाचे आव्हान! झडतीदरम्यान सापडणारा मोबाईल आत गेलाच कसा ?

01:23 PM Apr 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
कारागृहातील अदृश्य यंत्रणा शोधाचे आव्हान  झडतीदरम्यान सापडणारा मोबाईल आत गेलाच कसा
Kalamba Jail Kalamba Jail Kalamba Jail
Advertisement

चार्जिंग करणारी यंत्रणाही कारागृहातच आहे सक्रीय; ‘गेंड’सारखे झारीतील शुक्राचार्य शोधणे आवश्यक, 50 हजार रुपये घेऊन आत मोबाईल होतोय पोच

आशिष आडिवरेकर कोल्हापूर

कारागृहात मोबाईल सापडण्याच्या घटना तशा जुन्याच. पण हल्ली त्या वारंवार घडत आहेत. त्यातूनच कारागृहातील झडती दरम्यान मोबाईल सापडतो त्या अर्थी मोबाईल आत पोहोचवणारी, चार्जिंग करणारी यंत्रणाही कारागृहातच सक्रीय आहे. मोबाईल बाळगणारे जितके दोषी, तितकेच कारागृहात मोबाईल पोहोचवणाऱ्या यंत्रणेतील ‘खाकी’तील अदृश्य हातही तितकेच दोषी अन् जबाबदार आहेत. कारागृहात अर्थपुर्ण व्यवहार कऊन मोबाईल चार्जिंगसह इतर घटनांना खतपाणी घालणाऱ्या अदृश्य यंत्रणेला भेदण्याचे आवाहन सध्या कारागृह प्रशासनासोबतच तपास करणाऱ्या पोलिसांसमोर आहे.

Advertisement

कळंबा कारागृह 24 एकर जागेत पसरले असून 40 बॅराक तर 10 अंडा सेल येथे आहेत. दोनशेहून अधिक, अधिकारी, कर्मचारी सुरक्षेसाठी आहेत. कारागृह क्षमता 1800 असून यामध्ये 2400 हून अधिक बंदीजन शिक्षा भोगत आहेत. मोका लागलेल्या अनेक बड्या टोळ्dया कारागृहात असून त्यांची दादागिरी प्रशासनावर असते. कारागृहातील एका यंत्रणेला हाताशी धऊन मर्जीनुसार राहत असतात.

मोबाईल पोहोचवण्यासाठी 50 हजार रुपये
कळंबा कारागृहात मोबाईल पोहोचवण्यासाठी 50 हजार रुपये आकारण्यात येत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. महिनाभर मोबाईल जवळ बाळगण्यासाठी 4 हजार तर चार्जिगसाठी 2 हजार ऊपये घेतले जात असल्याचा आरोप बंदीजनाने एका संघटनेकडे केला होता. कारागृहात बंदीजनांना मदत करणारी अदृश्य यंत्रणा असून त्यांचे हात नेहमीच बंदीजनांच्या पाठिशी असतात. त्यामुळेच कळंबा मध्यवर्ती कारागृह बदनाम झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

गांजा, मोबाईल आढळल्याच्या घटना
2015 मध्ये कुख्यात गुंड बबलू जाविर व त्याच्या साथीदारांनी कारागृहात ओली पार्टी केली. त्याचे चित्रीकरण मोबाईलद्वारे व्हायरल केल्यानंतर याला वाचा फुटली.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून परत कारागृहात नेताना चपलामध्ये व गुप्तांगामध्ये लपवलेले 4 मोबाईल बंदीजनाकडे आढळले.

फेब्रुवारी 2017 मध्ये स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी हौदा टेम्पोतून साहित्य नेताना संशयित टेप्मोचालकांकडून 100 ग्रॅम गांजा जप्त केला.

6 ऑक्टोंबर 2017 मध्ये कारागृहात डंपरमधून 250 ग्रॅम गांजा, मोबाईल, चार्जर नेत असल्याची घटना उघडकीस आली.
27 नोव्हेंबर 2018 मध्ये बंदीजन डॉ. संतोष पोळ याने अंडा बॅराकमध्ये हातात पिस्तूल घेतलेला व्हिडीओ व्हायरल केला होता.
2019 व 2020 मध्ये कारागृहात गांजा सापडण्याच्या 4 घटना घडल्या. बॉलमधून गांजा कारागृहात फेकण्याची नवी पद्धत समोर आली.

या पूर्वीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई
कारागृहातील या विविध घटनांमुळे गेल्या काही वर्षात कारागृहातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये तत्कालीन कारागृह अधिक्षक सुधीर किंगरेंसह 12 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. मे 2019 मध्ये कैद्याच्या वाढदिवस पार्टी प्रसंगी तुऊंगाधिकारी सचिन पाटील याच्यासह 16 कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले होते. मोका अंतर्गत कारवाई झालेल्या एका कैद्याला त्याच्या नातेवाईकांना नियमबाह्य पद्धतीने भेटण्यास दिल्यामुळे कारागृह अधिक्षकांसह 15 जणांची चौकशी करुन निलंबीत केले. कारागृहातील दवाखान्यात एका कैद्याचा खून झाला. या प्रकरणी 7 जणांवर कारवाई केली. सापडलेला मोबाईल नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यासही निलंबीत करण्यात आले.

बाहेरच्या टोळ्यांचे लक्ष स्थानिक गुन्हेगारांकडे
कारागृहात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध बड्या राज्यातील कुख्यात गुंड व त्यांच्या टोळ्या शिक्षा भोगत आहेत. या सर्व टोळ्या स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धऊन कारागृहात गांजा, मोबाईल व इतर वस्तू पोहोचवत असतात. कळंबा कारागृहामध्ये अंडर ट्रायल असणारे पण सध्या रजेवर असणारे कैदी अशा टोळ्यांचे लक्ष असतात. या बंदीजनांना कारागृहाचा कानाकोपरा माहित असतो याचाच वापर या टोळ्या कऊन घेतात.

गेंडसारखे शुक्राचार्य
कारागृहातील निलंबीत सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड याच्या झडतीमध्ये गांजा सापडला होता. त्यानंतर त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या घराची झडती घेतली असता, 12 मोबाईल, 2 किलो गांजा मिळून आले होते. त्याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. तो आतील कैद्यांना गांजा, मोबाईल पुरवित असल्याचे तपासात समोर आले होते. गेंडसारखे झारीतील शुक्रार्चाय शोधण्याचे आवाहन कारागृह प्रशासनासमोर आहे.

Advertisement
Tags :

.