For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस स्थानक ते कॅफेपर्यंतचा प्रवास

06:45 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
पोलीस स्थानक ते कॅफेपर्यंतचा प्रवास
Advertisement

मेघालयाचे 140 वर्षे जुने पोलीस स्थानक चर्चेत

Advertisement

मेघालयाच्या सोहरा येथील 140 वर्षे जुने पोलीस स्थानक सध्या लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. अनेक वर्षे जुने हे पोलीस स्थानक आता एक कॅफे झाले असून मेघालयाच्या लोकांसोबत पर्यटकांदरम्यानही अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. एकेकाळी लोकांना शिक्षा देण्यासाठी वापरण्यात येणारे हे पोलीस स्थानक आता लोकांना रुचकर खाद्यपदार्थ पुरवत आहे.

1885 मध्ये स्थापित सोहरा पोलीस स्थानकाची इमारत मेघालयातील सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. ब्रिटिश शासनकाळात सोहरा पोलीस स्थानक एक धोकादायक कोठडी केंद्र होते. आता हे एका कॅफेत रुपांतरित झाले असून याल लोक ‘सोहरा 1885’ नावाने ओळखतात. हा कॅफे इतिहास आणि आतिथ्याचे अनोखे मिश्रण आहे. कधीकाळी या पोलीस स्थानकात ज्या ठिकाणी लॉकप होते, तेथे आता लोक बसून स्वादिष्ट भोजन करतात. सर्वप्रथम पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सिम यांनी या वारसास्थळाचा वापर पोलीस विभागाच्या कल्याणाकरता करण्याचा विचार मांडला होता. त्यांच्या या विचाराचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समर्थन पेले.

Advertisement

इतिहासाचे जतन

पोलीस स्थानक कॅफेत रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरता बिझनेस पार्टनर नफी नोंग्रुमने सोहरा पोलीस स्थानकाला कॅफेत बदलले आणि याचे नाव सोहरा 1885 कॅफे ठेवले. या कॅफेतून होणारा नफा पोलीस कल्याणाकरता वापरण्यात येतो. कॅफे तयार करताना पोलीस स्थानकाचा वारसा कायम ठेवण्यात आला असून याच्या डिझाइनमध्ये फारसे बदल करण्यात आले नाहीत. कॅफेत 100 लोक एकाचवेळी बसू शकतात.

Advertisement
Tags :

.