महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाल्याचा नेम अवघ्या एक सेंटीमीटरने चुकला

06:58 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डायमंड लीग फायनलमध्ये नीरज चोप्रा पुन्हा उपजेता : दुखापतीमुळे जेतेपदाला हुलकावणी

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रुसेल्स (बेल्जियम)

Advertisement

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीग फायनलमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला. पण कोट्यावधी भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का म्हणजे नीरज फक्त एक सेंटीमीटरने सुवर्णपदक जिंकण्यापासून मुकला. 0.01 मीटर म्हणजेच अवघ्या 1 सेमींच्या फरकाने त्याला अव्वल राहिलेल्या पीटर्स अँडरसनशी बरोबरी करण्यात अपयश आले. ग्रॅनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात 87.87 मीटर थ्रो फेकत जेतेपद पटकावले. नीरज चोप्राने आपल्या तिस्रया प्रयत्नात 87.86 मीटर भाला फेकला व सलग दुसऱ्या वर्षी त्याला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 85.97 मीटर च्या सर्वोत्तम प्रयत्नासह तिसरे स्थान पटकावले.

शनिवारी रात्री झालेल्या डायमंड लीग फायनलमधील भालाफेक प्रकारात जगभरातील सात अव्वल खेळाडू सहभागी झाले होते. यंदाच्या अंतिम फेरीत नीरज, ग्रेनेडाचा पीटर्स व जर्मनीचा ज्युलियन वेबर यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. विशेष म्हणजे, अंतिम फेरी सुरु होण्यापूर्वी गतविजेत्या याकुब वेडलेचने माघार घेतल्याचे दिसून आले. त्याच्या माघारीचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, डायमंड लीग फायनल 13 आणि 14 सप्टेंबर रोजी ब्रुसेल्स, बेल्जियम येथे झाली. शुक्रवारी, भारताचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत 9 व्या स्थानावर राहिला.

अवघ्या 1 सेंमीने हुकले जेतेपद

नीरजने पहिला प्रयत्नात 86.82 मीटर थ्रो केला, परंतु त्याचा सर्वात कठीण प्रतिस्पर्धी अँडरसन पीटर्सने 87.87 मीटर अंतरावर पहिलाच थ्रो फेकला. याच थ्रोने शेवटी पीटर्सला विजेतेपद मिळवून दिले. नीरजचा दुसरा थ्रो 84 मीटरपेक्षा कमी असला तरी तिसऱ्या थ्रोमध्ये त्याने 87.86 मीटर अंतर कापले व दुसरे स्थान कायम राखले. चौथ्या प्रयत्नात त्याने 82.04 मी तर पाचव्या प्रयत्नात 83.30 मी भाला फेकला. शेवटच्या प्रयत्नात पीटर्सला मागे टाकण्यासाठी सर्वोत्तम थ्रोची आवश्यकता होती पण भारतीय स्टारला शेवटचा थ्रो 86.46 मीटरपर्यंत टाकता आला. अर्थात, पीटर्सपेक्षा अवघ्या 1 सेमीं फरकाने मागे राहिल्याने त्याला उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. याउलट जर्मनीच्या वेबरला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही, तो तिसऱ्या स्थानी राहिला.

नीरजला सलग दुसऱ्यांदा उपजेतेपद

2022 मध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजने अंतिम फेरीत 88.44 मीटर भालाफेक करून डायमंड लीग चॅम्पियन बनण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला होता. यानंतर 2023 मध्ये नीरज 83.80 मीटर भाला फेकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यंदाच्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर या स्पर्धेत नीरज जेतेपद पटकावले असे अपेक्षित होते, पण यंदाही त्याला सलग दुसऱ्यांदा उपजेतेपदावर समाधान मानावे लागले.

डायमंड लीग फायनलमध्ये पीटर्स प्रथमच विजेता

ग्रेनेडाच्या पीटर्सने प्रथमच डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. गेल्या महिन्यात पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते. पीटर्सने दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली आहे. याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. 93.07 मीटर हा पीटर्सचा कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो आहे.

विजेत्या खेळाडूंना मोठे बक्षीस

डायमंड लीगचा चॅम्पियन बनणाऱ्या खेळाडूला 30 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला सुमारे 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर नीरज चोप्राला 12 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यास खेळाडूंना पदक मिळत नाही तर विजेतेपद जिंकल्यावर, खेळाडूला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी बक्षीस रक्कम आणि वाइल्ड कार्ड दिले जाते.

डायमंड लीग फायनलमधील अंतिम निकाल    

  1. पीटर्स अँडरसन - 87.87 मी
  2. नीरज चोप्रा - 87.86 मी
  3. वेबर ज्युलियन - 85.97 मी
  4. मार्डे एंड्रियन - 82.79 मी
  5. डीन रॉडरिक - 80.37 मी.

हात फ्रॅक्चर असतानाही नीरज लढला

डायमंड लीग फायनलमध्ये ग्रेनाडाच्या पीटर्सने 87.87 मीटर लांब भाला फेकत जेतेपद मिळवले तर अवघ्या एका सेंटीमीटरने नीरज चोप्राचे जेतेपद हुकले. दरम्यान, या स्पर्धेनंतर नीरजने एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे. सोमवारी सरावाच्या वेळी माझ्या हाताला दुखापत झाली आणि डाव्या हाताला चौथ्या बोटामध्ये फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले. हे माझ्यासाठी धक्कादायक होते पण माझ्या टीमच्या मदतीने मी ब्रुसेल्सला उपस्थित राहू शकलो, असे नीरजने सांगितले दरम्यान, या स्पर्धेसह यंदाच्या वर्षातील नीरजसाठी चालू हंगाम देखील संपला आहे. यावेळी नीरजने फ्रॅक्चर असलेल्या हाताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

डायमंड लीग फायनल ही वर्षातील शेवटची स्पर्धा होती आणि मला माझा हंगाम मैदानावर संपवायचा होता. जरी मी माझ्या अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलो नसलो तरी मला वाटते की हा एक असा हंगाम होता ज्यामध्ये मी खूप काही शिकलो. आता, पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुन्हा परतण्यासाठी उत्सुक आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी आभार. आता 2025 वर्षाची वाट पाहतोय.

-नीरज चोप्रा, दिग्गज भालाफेकपटू

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article