महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हरमलात मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर

12:50 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /हरमल 

Advertisement

येथील प्रमुख रस्त्यांवर सध्या मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. संबंधित गुरांचे मालक मोकाट सोडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात,अशा गुरांबाबत पंचायतीने पुढाकार घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान, पंचायतीची कोंडवाडा योजना धुळखात पडलेली आहे. मात्र पंचायत समितीने बेवारस गुरांना पकडून नेण्यासाठी सिकेरी गोशाळा समितीशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील गुरांची अडचण कमी होईल, असे पेडणेकर यानी सांगितले. विशेषत: रात्रीच्यावेळी गुरे रस्त्यावर बसतात त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात घडतात, असे वाहन चालक टोनी डिमेलो म्हणाले. स्थानिक नागरिक विष्णू नाईक यांनीही पंचायतीने मोकाट गुरांसाठी उपाययोजना आखावी, अशी मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article