महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्त्रायल-हमास युध्द काही थांबण्याची चिन्हे नाहीत.

06:43 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हमास-इस्त्रायल युध्द दुसऱ्या टप्प्यात

Advertisement

इस्त्रायल-हमास युध्द काही थांबण्याची चिन्हे नाहीत. सात दिवसांची शस्त्रसंधी संपण्यास काही काळ असताना पुन्हा युध्दाची ठिणगी पडली आहे. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, हमासने ओलिस धरलेल्या महिलांना मुक्त करण्याची अट पाळली नाही. याउलट इस्त्रायली नागरिकांवर हल्ले सुरू केले. दुसरीकडे हमासने इस्त्रायलला दोष देताना इतर ओलिसांना सोडण्याबाबतचे सारे प्रस्ताव इस्त्रायलने धुडकावले असे म्हटले आहे. इस्त्रायली आक्रमण सुरूच ठेवायचे हा निर्णय आधीच घेतला गेला होता. अमेरिकेचा या निर्णयास पाठींबा होता, असे स्पष्टीकरणही हमासने दिले आहे. एक आठवडाभराच्या शस्त्रसंधीनंतर नेतान्याहू यांच्यावर युध्द पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांच्याच पक्षातील उजव्या गटाचे दडपण होते, असेही निरीक्षकांचे म्हणणे आहे. हमास प्रणित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार शस्त्रसंधी संपल्या संपल्या काही तासात गाझा पट्टीत 60 नागरिक मारले गेले. शस्त्रसंधी आधी मारल्या गेलेल्या 15,000 पॅलेस्टाईन नागरिकांत आणखी भर पडली आहे. ‘युनिसेफ’ या युनोच्या बालक शाखेचे प्रतिनिधी जेम्स एल्डर यांनी दक्षिण गाझामधील एका इस्पितळातून आपले मत व्यक्त करताना, परिस्थिती लोकांसाठी भयंकर असल्याचे म्हणत लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत आहे. शस्त्रसंधी हे केवळ दिवास्वप्न ठरल्याचे प्रतिपादन केले.

Advertisement

इस्त्रायलने आतापर्यंत दहा हजार क्षेपणास्त्रs आणि बॉम्बस्चा मारा गाझापट्टीवर केला असून 98,000 इमारतींना नुकसान पोहचले आहे. या हल्यांमुळे मानवतावादी मदत योग्य ठिकाणी पोहचणे कठीण बनले आहे. मदत संस्थांना जेथे तेथे उध्वस्तीकरण पाहण्यास मिळत आहे. 7

ऑक्टोबरच्या हमास हल्यानंतर इस्त्रायली सैन्याने गाझा पट्टीच्या भोवताली विशेषत: गाझा पट्टीच्या उत्तर भागात लक्ष केंद्रीत केले होते. आता दक्षिण भागावर लष्कर हल्ले चढवत असल्याचे चित्र आहे. इस्त्रायली संरक्षण विभागाने 2000 क्षेत्रात विभागलेला गाझाचा नकाशा बनवला असून पुढील संघर्षापासून वाचवण्यासाठी लोकांना अनुकूल व्हावे, त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे यासाठी ‘लवकर जागा रिकाम्या करा सुरक्षित स्थानी आश्रय  घ्या’ या आशयाची अरेबिक भाषेतील पत्रके विमानातून टाकण्यात येत आहेत. दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी इस्त्रायली सरकारला मोठ्या प्रमाणातील विस्थापन पॅलेस्टाईनमध्ये होऊ देऊ नका. ‘इस्पितळे, विद्युत केंद्रे, शिक्षण संस्था, जल सुविधांवर हल्ले करू नका, युध्दाच्या दुसऱ्या टप्यात नागरिकांना सुरक्षित ठेवा’ असे आवाहन केले. त्यानंतर इस्त्रायलकडून युध्दाचे दुसरे सत्र सुरू झाले हे विशेष म्हणावे लागेल. इस्त्रायलने आपली मोहिम विस्तारीत केल्यानंतर युनोच्या मानवाधिकार समितीचे उच्चायुक्त व्होल्कर टर्क यांनी शेकडो, हजारो गाझापट्टीवासिय हे अत्यंत कमी जागेत कोंबले गेले असून गाझात कुठलीही जागा सुरक्षित नसल्याचे निरिक्षण मांडले आहे. तर इस्त्रायलच्या शेजारी जॉर्डन देश जो इस्त्रायल-पॅलेस्टिन करारात भागीदार आहे. त्याने सुरू असलेल्या इस्त्रायली हल्यामुळे अधिक विस्थापन होण्याची शक्यता वर्तविली आहे. दुसरीकडे गाझाशी सीमा जुळलेल्या आणि इस्त्रायलशी शांतता करार केलेल्या इजिप्तने आपल्या भागात

पॅलेस्टाईन लोकांच्या आगमनाच्या शक्यता नाकारत आम्ही तेथील कोणत्याही लोकांच्या सोडवणूकीसाठी प्रयत्नशील नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गाझा विस्थापितांचा हा दरवाजा बंद झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सात दिवसांची शस्त्रसंधी ज्यामुळे 105 इस्त्रायली ओलिस व 240

पॅलेस्टीनी कैद्यांची सुटका झाली ही खूप पूर्वीची घटना वाटत आहे. दक्षिण गाझात विशेषत: खान युनुस शहरावर चढविलेल्या हल्याचे कारण इस्त्रायली सुत्रानुसार हे आहे की, हमासचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती या भागात लपून आहेत. जर या म्होरक्यांना आपण ठार करू शकलो तर हमासचे निर्दालन करण्यासाठीचे ते एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. हमासने 7 ऑक्टोबर रोजी आकस्मिक हल्ला चढविल्यानंतर इस्त्रायलने प्रत्युत्तरादाखल जी कारवाई केली तेव्हा त्याच्या दोस्त राष्ट्रांकडून विशेषत: अमेरिकेकडून फारसे राजनैतिक दडपण आणले गेले नव्हते. हमासच्या आगळिकीस प्रत्युत्तर देण्याचा व आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार इस्त्रायलला आहे असे अमेरिकेने म्हटले होते. पण या हल्यात नागरिक बळी जावू नयेत, याची दक्षता घेण्यास व युध्द विषयक मर्यादा व नितीमता पाळण्यास सांगितले होते.

इतर कोणत्याही देशांपेक्षा आपल्या कृतींवर आंतरराष्ट्रीय टीका झेलण्याची इस्त्रायलची सहनशक्ती अधिक आहे. त्याला केवळ अपवाद इस्त्रायलचा खंदा पाठीराखा असलेल्या अमेरिकेचा आहे. गेल्या गुरूवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी इस्त्रायलच्या युध्द मंत्रीमंडळास ‘गाझामध्ये हमासला हरविण्यासाठीची जी योजना आहे ती संपवण्यास तुमच्याकडे काही आठवडेच आहेत. उत्तर गाझामध्ये नागरी जीवनाची जशी हानी व विस्थापन झाले त्याची पुनरावृत्ती दक्षिण गाझात होऊ नये’ असा स्पष्ट इशारा पत्रकार परिषदेत दिला. याच इशाऱ्याचे प्रतिबिंब उपाध्यक्षा कमला हॅरिस व संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांच्या वक्तव्यातूनही उमटले. परंतु

वॉल स्ट्रिट जर्नलच्या वृत्तांकनानुसार अमेरिकेने युध्द सुरू झाल्यापासून इस्त्रायलसाठीच्या शस्त्र पुरवठ्यात लक्षणीय वाढ केली आहे. हजारो बॉम्बस, स्फोटके, खंदक उध्वस्त करणारी सामुग्री याचा मोठा पुरवठा सुरू आहे. याचाच अर्थ असा की, अमेरिकेच्या उक्तीत आणि कृतीत फरक आहे.

एकूण परिस्थितीवरून असे जाणवते की हमासने इस्त्रायलवर केलेला हल्ला या संघटनेच्या भलताच अंगलट आला आहे. इस्त्रायलचे गाझा पट्टीतील अतिक्रमण, पॅलेस्टाईन अरबांचे विदारक जीवन, स्वतंत्र देशाचा दिर्घ काळ लांबलेला प्रश्न यावर वैफल्यग्रस्त उपाय म्हणून या संघटनेने इस्त्रायलवर हल्याचा माथेफिरू मार्ग अवलंबला खरा परंतु त्यांच्या परिणामांची जाण कदाचित या संघटनेस नसावी. आज पूर्वीसारखा कोणताच अरब देश

पॅलेस्टाईनच्या बाजूने सक्रियपणे उभा राहण्यास तयार नाही. अगदी इराणही अंतर्गत संकटाने ग्रासला आहे. मध्यंतरीच्या काळात इस्त्रायल व अमेरिकेचे अरब देशांशी संबंध सुधारले आहेत. ज्या पध्दतीने रशियन आक्रमणानंतर युक्रेन इतर देशांच्या मदतीअभावी होरपळत गेला त्याच पध्दतीने इस्त्रायली प्रतिआक्रमणानंतर पॅलेस्टाईनची परिस्थिती आहे. एकटा कतार हा देश पुन्हा शस्त्रसंधीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र हमासचा पुरता बिमोड व स्वतंत्र पॅलेस्टाईनचे स्वप्न पुरते उध्वस्त केल्याशिवाय इस्त्रायल आता थांबण्याची चिन्हे नाहीत.

-अनिल आजगावकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article