दोन हजार वर्षांपूर्वीच्या यंत्राचा शोध
जहाजाच्या अवशेषातून मिळाले यंत्र
जगात पहिल्यांदाच संगणकासारखे एक यंत्र सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आले होते. जहाजाच्या अवशेषातून मिळालेल्या एका यंत्राच्या आधारावर हा दावा करण्यात येत आहे. 2 हजार वर्षे जुन्या या जटिल उपकरणच्या शोधामुळे वैज्ञानिक अवाक् झाले आहेत, या यंत्राला एंटीकिथेरा मॅपेनिज्मच्या नावाने ओळखले जाते आणि याला पहिला संगणक म्हटले जोत. 1901 च्या एका ग्रीक जहाजाच्या अवशेषात हे यंत्र आढळून आले आहे. हाताद्वारे संचालित होणारे हे उपकरण सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या आकाशीय हालचालींना ट्रॅक करण्यासाठी एका विंड-अप प्रणालीचा वापर करत होते. हे एक कॅलेंडर म्हणूनही काम करत होते, जे चंद्रग्रहणांच्या कालावधीबद्दल माहिती देत होते. हे यंत्र पुढील 1 हजार वर्षांमध्ये तयार करण्यात आलेल्या कुठल्याही अन्य उपकरणाच्या तुलनेत अधिक विकसित होते असे म्हटले जाऊ शकते. सध्या एंटीकाइथेरा यंत्र 82 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये आहे. याच्या मूळ संरचनेचा केवळ एक तृतीयांश हिस्साच शिल्लक असून यात 30 संक्षारणित कांस्य गियरव्हिल सामील आहेत. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी उपकरणाच्या कार्यपद्धतीचा शोधण्यासाठी 3डी कॉम्प्युटर मॉडेलिंगचा वापर केला आहे. आमची पुनर्निर्मिती अशा सर्व पुराव्यांवर फिट बसते, जे वैज्ञानिकांना आतापर्यंत अवशेषांमधून प्राप्त केले आहे असे युसीएलचे वैज्ञानिक अॅडम वोजिक यांनी सांगितले आहे.
संशोधकांनुसार हे उपकरण संकेंद्रित वलयांवर सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या हालचालींना ट्रीक करत होते, जे प्राचीन युनानी मान्यता दर्शविते. या मान्यतेनुसार हे खगोलीय पिंड पृथ्वीच्या चहुबाजूला फिरत असते. या जटिल 3डी रहस्याची उकल केल्याने खगोलशास्त्र, प्लेटोच्या अकॅडमीची गणित आणि प्राचीन युनानी खगोलील सिद्धांतांमधून प्रतिभा-संयोजन चक्रांच्या निर्मितीचा शोध लागत असल्याचे वैज्ञानिकांच्या अहवालात म्हटले गेले आहे.