महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेट्टरांकडूनच शहराच्या औद्योगिक विकासाला खीळ

12:54 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार चन्नराज हट्टीहोळी : कणबर्गी येथे प्रचारसभेत डागली तोफ

Advertisement

बेळगाव : भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर बेळगाव माझी कर्मभूमी असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी बेळगावच्या विकासाला खीळ घातली आहे. शहराच्या विकासासाठी औद्योगिक कॉरिडॉर निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यावर त्यांनी कोणतीची प्रतिक्रिया न देता प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केला. कणबर्गी येथे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार मेळाव्यादरम्यान ते बोलत होते. जगदीश शेट्टर जिल्हा पालकमंत्री व तत्कालीन औद्योगिक मंत्री होते. त्यावेळी बेंगळूर येथे उद्योजकाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीला आपणही उद्योजक म्हणून सहभागी झालो होतो. त्यावेळी आपण बेळगावसाठी औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, शेट्टर केवळ हुबळीचाच उल्लेख करत होते. यामुळेच बेळगावच्या विकासाला खीळ बसली आहे. बेळगावच्या विकासाबद्दल त्यांच्या मनामध्ये कोणतीही योजना नव्हती. या माध्यमातून त्यांनी बेळगाववर अन्याय केला आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, काँग्रेस सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे. भाजपकडून केवळ श्रीमंतांचे हित पाहिले जात आहे. त्यामुळेच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीला विरोध केला जात आहे. गॅरंटी योजना बंद करण्याची मागणी केली जात आहे. अशा नेत्यांकडून गोरगरिबांचे कल्याण होणार का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी आमदार राजू सेठ यांनी आपण आमदार झाल्यानंतर उत्तर मतदारसंघात अनेक विकासकामे राबविली आहेत. यापुढेही मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत राहू, काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article