सलग तिसऱ्या सत्रात भारतीय बाजार नुकसानीत
सेन्सेक्स 495 अंकांनी नुकसानीत : वाहन क्षेत्राला फटका
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात घसरणीचा कल राहिला. यामध्ये विदेशी गुंतवणुकदारांची विक्री सुरू राहिल्याने भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला आहे. यावेळी रिअल्टी, वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजार प्रभावीत होत बंद झाला. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 494.75 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.61 टक्क्यांसोबत 81,006.61 वर बंद झाला. बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण राहिली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील 221.45 अंकांच्या तीव्र घसरणीसह 0.89 टक्क्यांच्या नुकसानीसोबत 24,749.85 वर बंद झाला.
निफ्टीमधील 41 कंपन्यांचे समभाग प्रभावीत होत बंद झाले तर केवळ 9 कंपन्यांचे समभाग वधारले आहेत. अव्वल घसरणीमध्ये सेन्सेक्समधील 30 कंपन्यांमध्ये नेस्ले इंडियाचा हिस्सा 3 टक्क्यांहून अधिक घसरला. सप्टेंबर तिमाहीचा नफा 0.94 टक्क्यांनी घसरल्यानंतर एफएमसीजी कंपनीचे समभाग घसरले आहेत. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, टायटन, टाटा स्टील, मारुती, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, टाटा मोटर्स यांचे समभाग घसरले. दुसरीकडे, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक सारख्या आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारून बंद झाले. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रिड, एल अँड टी यांचे शेअर्सही वधारले आहेत.
बाजारातील घसरणीचे कारण?
गुरुवारी शेअर बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये झालेली घसरण. बजाज ऑटोचे शेअर 12 टक्क्यांनी घसरले. कारण सणासुदीच्या हंगामात कंपनीला कमकुवत विक्रीची भीती आहे. वाहन कंपन्यांचे म्हणणे आहे की महागाई, विशेषत: अन्न आणि पेय पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या खरेदीवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे वाहन क्षेत्रावर दबाव येत आहे. या विधानाचा परिणाम इतर वाहन कंपन्यांवर आणि संपूर्ण बाजारावर झाला.
याशिवाय भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या माघारीचाही परिणाम दिसून येत आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा मुद्दा असून भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार सतत पैसे काढून घेत आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी 3,435.94 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, असे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार सांगितले आहे. जागतिक बाजारपेठेत आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरून बंद झाले. युरोपीय बाजार तेजीत होते. बुधवारी अमेरिकन बाजार सकारात्मकतेत बंद झाले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इन्फोसिस 1969
- टेक महिंद्रा 1699
- पॉवरग्रिड कॉर्प 331
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3567
- स्टेट बँक 810
- टीसीएस 4106
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2713
- एचसीएल टेक 1867
- इंडसइंड बँक 1347
- हिंडाल्को 734
समभाग घसरलेल्या कंपन्या
- नेस्ले 2379
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2963
- अल्ट्राटेक सिमेंट 11018
- बजाज फिनसर्व्ह 1815
- टायटन 3400
- टाटा स्टील 152
- मारुती सुझुकी 12143
- भारती एअरटेल 1702
- अॅक्सिस बँक 1132
- टाटा मोटर्स 891
- एनटीपीसी 419
- हिंदुस्थान युनि 2737
- एचडीएफसी बँक 1673
- जेएसडब्ल्यू स्टील 981
- आयटीसी 488
- आयसीआयसीआय 1232
- एशियन पेन्ट्स 3053
- बजाज फायनान्स 6901
- विप्रो 528
- कोटक महिंद्रा 1863
- सनफार्मा 1892
- हॅवेल्स इंडिया 1826
- कोलगेट 3365
- अंबुजा सिमेंट 571
- कमिन्स 3692
- मॅक्स हेल्थकेअर 938
- बीपीसीएल 342
- आयआरसीटीसी 872
- अशोक लेलँड 219
- ग्रासिम 2700
- मॅरिको 666