For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गोव्यातील ‘इंडिया’ घटक पक्ष काँग्रेसवर नाराज

11:04 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यातील ‘इंडिया’ घटक पक्ष काँग्रेसवर नाराज

उमेदवार जाहीर करण्यास विलंबाचा परिणाम

Advertisement

पणजी : काँग्रेसचे दोन्ही लोकसभा उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे गोव्यातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष संतापले आहेत. त्या पक्षांनी काँग्रेसला वगळून वेगळी स्वतंत्र बैठक घेतल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांनी त्या बैठकीची पुष्टी केली आहे. या वेगळ्dया बैठकीमुळे गोव्यातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षात फूट पडली की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. गेले जवळजवळ 15 दिवस काँग्रेसची दोन्ही जागांवरील उमेदवारी लटकली असून त्या पक्षाचे नेते फक्त आज - उद्या उमेदवार जाहीर होतील एवढेच सांगून तोंड बंद कऊन बसत आहेत. काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यातच अनेक दिवस वाया घालवले असून त्याची गंभी दखल इंडिया आघाडीतील गोव्यातील घटक पक्षांनी घेतली आहे. काँग्रेसची उमेदवारी नेमकी कोणामुळे आणि कशासाठी रखडली आहे तेच कळत नाही. त्यांच्या संभाव्य उमेदवारांना देखील त्याची कारणे माहीत नाहीत अशी परिस्थिती आहे. काँग्रेसच्या या वेळकाढूपणाच्या धोरणामुळे घटक पक्ष वैतागले असून त्यांनी घेतलेल्या स्वतंत्र बैठकीत काँग्रेस पक्षावर टीका केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

काँग्रेसची प्रचार मोहीम थंडच

Advertisement

भाजपने दक्षिण गोव्यासाठीची उमेदवारी उशिरा जाहीर कऊनही तो पक्ष झपाट्याने प्रचाराला लागल्याचे दिसत आहे. या उलट काँग्रेस पक्ष अजूनही उमेदवार ठरवण्यासाठी चाचपडतो, धडपडतो आहे. दोन्ही जागांवरील उमेदवारांचे एकमत होत नसल्यामुळे फक्त दिवस ढकलण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत असल्याचे दिसून येते. उमेदवारच ठरत नसल्यामुळे काँग्रेसची प्रचार मोहीम अजून सुऊ झालेली नाही तर ती थंडच आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.