For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रकच्या धडकेने ट्रॅक्टरसह चालकाचेही तुकडे

11:26 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रकच्या धडकेने ट्रॅक्टरसह चालकाचेही तुकडे
Advertisement

हलग्यानजीक अपघात : युवा शेतकऱ्याचा बळी

Advertisement

बेळगाव : भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा अंडरब्रिजजवळ घडलेल्या अपघातात बस्तवाड येथील एक शेतकरी जागीच ठार झाला. रविवारी पहाटे 5.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून ट्रकच्या ठोकरीने ट्रॅक्टरचे अनेक तुकडे झाले होते. मल्लसर्ज पारिस दो•कल्लण्णावर (वय 43) रा. विद्यानगर, बस्तवाड असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून मल्लसर्ज हे ग्राम पंचायत सदस्यही होते. या अपघातानंतर ट्रकचालकाने आपली ट्रक तेथेच उभी करून पलायन केले आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रविवारी पहाटे आपल्या ट्रॅक्टरमधून कोथिंबीर घेऊन मल्लसर्ज बेळगावला येत होते. त्यावेळी धारवाडहून बेळगावकडे येणाऱ्या एमएच 12, युएम 4783 क्रमांकाच्या भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातानंतर ट्रॅक्टरचे तुकडे महामार्गावरून सर्व्हिस रोडवर जाऊन पडले. ट्रकची धडक इतकी भीषण होती, की मल्लसर्ज यांच्या मृतदेहाचेही तुकडे झाले होते. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षक गुरुशांत दाशाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टरला धडक देणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.