महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

देव बलभद्राची मूर्ती सेवकांवर कोसळली

06:01 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रथातून उतरवताना दुर्घटना : 9 जखमी; मूर्ती सुरक्षित

Advertisement

वृत्तसंस्था/ पुरी

Advertisement

ओडिशातील पुरीमधील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान गुंडीचा मंदिरात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भगवान बलभद्राची मूर्ती सेवकांवर कोसळली. यामध्ये 9 जण जखमी झाले. मात्र, देवकृपेने मूर्तीचे कोणतेही नुकसान नाही. सेवक देवाच्या मूर्ती रथातून उतरवून मंदिरात नेत होते. याचदरम्यान बलभद्राची मूर्ती उतरवत असताना ती एका बाजूल कलंडली. या घटनेत जखमी झालेल्यांपैकी 5 जणांवर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. ऊग्णालयात दाखल केलेल्या दोघांना नंतर डिस्चार्ज देण्यात आला. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या घटनेचा आढावा घेत जखमींना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. त्यांनी कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांना तातडीने पुरी येथे जाऊन योग्य ती पावले उचलण्याची सूचना केली.

रथ ओढताना दोघांचा मृत्यू

7 जुलै रोजी पुरीमध्ये रथयात्रेदरम्यान भगवान बलभद्रांचा तलध्वज रथ ओढताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये गुदमरून दोन भक्तांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 130 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यात काही पोलिसांचाही समावेश होता. यात्रेमध्ये रथ ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत असल्याने अशा घटना घडत असतात. गेल्यावषी 20 जून रोजी पुरीमध्ये भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढताना सुमारे 14 जण जखमी झाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article