कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मानवी मेंदू फार काळ राहणार नाही प्रायव्हेट

06:14 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्ययनात झाला चकित करणारा खुलासा

Advertisement

मानवी मेंदूतील हालचाली ओळखणाऱ्या यंत्राविषयी तुम्ही वाचले असेल. हे मागील काही काळापासून अस्तित्वात आहे. 1895 मध्ये वैज्ञानिक ज्युलियस एम्मनर यांनी आपले यंत्र विचारांच्या पॅटर्नला ध्वनीच्या मुद्रणाप्रमाणे रेकॉर्ड करू शकते असा दावा केला होता. एम्मनरच्या यांच्या डोक्यात हा विचार फोनोटोग्राफद्वारे आला होता, जे हवेतून ध्वनितरंगांना मिळवून कागदावर लिहू शकत होते. त्यावेळी विचारासोबत देखील असे करण्यास सक्षम ठरू शकतो असे एम्मनर यांचे त्यावेळी मानणे होते.

Advertisement

ज्युलियस एम्मनर स्वत:च्या यंत्राद्वारे विचारांना ‘मानसिक छायाचित्रां’मध्ये रिकॉर्ड करू इच्छित होते. एम्मनर यांच्यानुसार मानवी मेंदूला जाणून घेण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली होती. याद्वारे विचार रिकॉर्ड करणे सोपे ठरले असते. काहीही लपवून ठेवणे अशक्य ठरले असते.

तर आता एलॉन मस्क यांची कंपनी न्यूरालिंकने अलिकडेच स्वत:च्या प्रत्यारोपित इलेक्ट्रोडसाठी मानवी परीक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे. याचा उद्देश न्यूरॉन्समधील संकेत वाचणे आहे. मानव आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला एकत्र आणणे हा आमचा उद्देश आहे. याचबरोबर सिंक्रोनने मायक्रोइलेक्ट्रोडचा  आविष्कार केला असून ते मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून स्थापित केले जाऊ शकते. यामुळे ओपन ब्रेन सर्जरीची आवश्यकता भासणार नाही असे मस्क यांनी सांगितले आहे.

हे जर खरोखरच घडलेतर भविष्यात मानवी मेंदूतील विचार जाणून घेणे सोपे ठरणार आहे. तुम्ही स्वत:च्या डोक्यात कुठलीही गोष्ट प्रायव्हेट ठेवू शकणार नाही. जर तुम्ही कुठलाही विचार केला तर तो केवळ तुमच्यापुरती मर्यादित राहणार नाही. इतर माणसं देखील हा विचार वाचण्यास सक्षम ठरणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article