For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निळ्या रंगाचे दूध

06:13 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
निळ्या रंगाचे दूध
Advertisement

एक लिटर पिताच 100 किलोने वाढणार वजन

Advertisement

जगातील सर्वात रहस्यमय आणि पौष्टिक दूधामध्ये व्हेल माशाचे दूध अग्रस्थानी आहे. हे दूध केवळ सर्वात दाट असण्यासोबत इतक्या पोषक घटकांनी भरपूर आहे की, ब्ल्यू व्हेलचे पिल्लू केवळ काही महिन्यांमध्ये हजार किलोने वजन वाढवून घेते. एका लिटर दूधात 50 टक्के फॅट असते, जे गायीच्या दूधाच्या 4 टक्क्यांच्या तुलनेत 12 पट अधिक आहे. माणसाने हे दूध पिल्यास वजन वेगाने वाढू शकते. परंतु याची चव तुमची शुद्ध हरपू शकते.

वैज्ञानिकांनुसार व्हेलचे दूध टूथपेस्टसारखे दाट असते, जे पाण्यात विरघळत नाही. हे दूध म्हणजे सागरी जीवनाचा चमत्कार आहे, जे व्हेल परिवाराच्या मातांना स्वत:च्या पिल्लांना पोषण देण्यास मदत करते. व्हेल मासा सस्तनधारी प्राणी असून तो पाण्यात राहूनही स्वत:च्या पिल्लांना दूध पाजवितो. ब्ल्यू व्हेल जगातील सर्वात मोठा जीव असून 3 टन वजनासह पिल्लांना जन्म देत असतो. परंतु विकासासाठी आवश्यक पोषण दूधाद्वारेच प्राप्त होते. मादी व्हेल प्रतिदिन 200 लिटरपर्यंत दूध तयार करते, ज्यात 35-50 टक्के फॅट आणि 12 टक्के प्रोटीन असते. हे निळ्या रंगाचे असते.

Advertisement

बेबी व्हेल स्वत:च्या आईचे दूध पिऊन एका दिवसात 100 किलोपर्यंत वजन वाढवून घेते. 6 महिन्यात हे पिल्लू 25 टनापर्यंत पोहोचते, हा विकास अत्यंत आवश्यक आहे, कारण व्हेल मासे दीर्घ प्रवास करत असतात. दूधाची ही संरचना पिल्लांना ऊर्जा देते, जेणेकरून ते स्वत:च्या आईसोबत संचार करू शकतील. या दूधातील दाटपणामागे फॅट ग्लोब्यूल्स कारणीभूत आहे.

स्वाद अत्यंत विचित्र

या दूधाला माशाचा तीव्र गंध असतो. जो व्हेलच्या आहारातून (प्लँकटन) प्राप्त होतो. माणसाने याची चव चाखल्यास उलटी होण्याची शक्यता असते.  परंतु व्हेलच्या पिल्लांसाठी हे अत्यंत योग्य आहे. व्हेल दूधात ओमेगा-3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

Advertisement
Tags :

.