महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रचंड हेलिकॉप्टरचे परीक्षण ठरले यशस्वी

06:13 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेक इन इंडिया’ला मोठे यश : पर्वतीय भागात फायरिंग करण्याची क्षमता सिद्ध

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय सैन्याने एक ऐतिहासिक कामगिरी करत प्रचंड हेलिकॉप्टरचे हाय अल्टीट्यूड (उंचीयुक्त भागांमध्ये) क्षेत्रांमध्ये फायरिंगचे यशस्वी परीक्षण केले आहे. सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी ही मोठी कामगिरी ठरली आहे. प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती भारतातच करण्यात आली आहे.

भारतीय सैन्याने या परीक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या यशस्वी परीक्षणामुळे भारतीय सैन्याची युद्धसज्जता मजबूत होणार असल्याचे याच्या कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे.

प्रचंड एक हलके लढाऊ हेलिकॉप्टर असून जे 5 हजार मीटरच्या उंचीवर शस्त्रास्त्रs आणि इंधनाच्या मोठ्या भारासह उ•ाण करणे आणि लँड करण्यास सक्षम आहे. हे हेलिकॉप्टर रडारपासून बचावासाठी डिझाइन करण्यात आले आहे. प्रचंड हेलिकॉप्टर काउंटर मेजर डिस्पेंसिंग सिस्टीमने युक्त असून यामुळे शत्रूच्या रडारपासून ते वाचू शकते. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने प्रचंड हेलिकॉप्टरची निर्मिती केली असून यात फ्रान्सकडून निर्मित इंजिन वापरण्यात आले आहे.

1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरची आवश्यकता भासली होती. भारतीय सीमेतून अचूक हल्ले करण्यासाठी अशाप्रकारचे हेलिकॉप्टर गरजेचे ठरले होते. प्रचंड हेलिकॉप्टर वाळवंटाच्या भीषण उष्णतेसोबत अत्यंत थंडी असलेल्या उंच पर्वतीय भागांमध्येही उपयुक्त ठरू शकते. केंद्र सरकारने ऑक्टोबर 2006 मध्ये एलसीएच प्रचंड प्रकल्पाला मंजुरी दिली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article