For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्मी टेकडी येथील घर जेसीबीच्या साहाय्याने पाडले

11:36 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्मी टेकडी येथील घर जेसीबीच्या साहाय्याने पाडले
Advertisement

बेळगाव : लक्ष्मी टेकडी येथील एक घर जेसीबीने पाडविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून, रविवारी रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुष्पा व त्यांची मुलगी रहात असलेले घर पाडवण्यात आले आहे. ही घटना घडली त्यावेळी कुटुंबीय घरात नव्हते. ते कामावर गेले होते. शेजाऱ्यांनी हा प्रकार कळविल्यानंतर कुटुंबीय लक्ष्मी टेकडी येथे दाखल झाले. तोपर्यंत जेसीबीने पूर्णपणे घर पाडविण्यात आले होते. यासंबंधी रविवारी पत्रकारांना माहिती देताना पुष्पा म्हणाल्या, वीस वर्षांपूर्वी माझ्या आईने ही जागा खरेदी केली होती. या जागेवर आम्ही घर बांधून आहोत. या जागेचा वाद सुरू आहे. शनिवारी जेसीबीने ते पाडविण्यात आले आहे. यापूर्वीही अनेकवेळा गुंडगिरीचा प्रकार झाल्याचे या महिलेने सांगितले. रविवारी रात्री कॅम्प पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.