पृथ्वीवरील सर्वात उष्ण अन् थंड ठिकाण
तापमान कळल्यावर व्हाल चकित
पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे हवामान दिसून येते, काही ठिकाणी भयानक थंडी असते, तर काही ठिकाण अत्याधिक उष्णता. जगात काही ठिकाणं अशी आहेत जी सर्वात उष्ण आणि थंड ठरतात. पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण अमेरिकेतील डेथ व्हॅली आहे. येथे 10 जुलै 1931 रोजी तापमान 56.7 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते.
डेथ व्हॅलीमध्ये उन्हाळ्यात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तर हे केवळ हवेचे तापमान आहे, जमीन याहून दुप्पट तप्त असते. 15 जुलै 1972 रोज डेथ व्हॅलीमध्ये जमिनीचे तापमान 93.9 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते.
तर सर्वात थंड ठिकाण अंटार्क्टिका आहे. अंटार्क्टिकाच्या मधोमध्य एक ठिकाण आहे, जेथील तापमान शून्य ते उणे 93.2 अंश सेल्सिअसदरम्यान राहते. यापूर्वी अंटार्क्टिकात सर्वात कमी तापमान शून्य ते उणे 89.2 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. इतके कमी तापमान असल्याने येथे जीवन अत्यंत अवघड असते. तेथे बर्फही मोत्यांसारखा दिसून येत असतो.