महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विरोधकांचे जागा वाटपाचे घोडे अडलेलेच

06:02 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विलंब लागणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था / पाटणा

Advertisement

लोकसभेची निवडणूक दिवसेंदिवस अधिकाधिक नजीक येत असताना विरोधकांच्या आघाडीचे जागावाटपाचे घोडे अद्याप अडलेलेच आहे. जागावाटप लवकर होणार नाही. त्याला आणखी वेळ लागणार आहे, असे वक्तव्य आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केले आहे.

विरोधकांच्या आघाडीत अनेक पक्ष आहेत. त्या सर्वांचे समाधान होईल, असे जागावाटप होणे लवकर शक्य नाही. त्याला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र, याचा अर्थ आघाडीत बेबनाव आहे, असा होत नाही. आघाडीतील सर्व पक्ष एकजूट आहेत. त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

चर्चेच्या सहा फेऱ्या

आतापर्यंत विरोधी पक्षांच्या आघाडीच्या जागावाटपासाठी चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. तरीही निश्चित तोडगा निघालेला नाही. अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांमध्येच जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी स्पर्धा आहे. परिणामी अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑन लाईन बैठकीत आघाडीचे संयोजकपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक पक्षांचे तळ्यात-मळ्यात

अनेक पक्षांनी अद्यापही आघाडीसंदर्भात दृढ भूमीका घेतल्याचे दिसत नाही. या पक्षांचे प्रवक्ते आणि मध्यल्या फळीतील नेते एकमेकांच्या पक्षाविरोधात वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे आघाडीतील पक्षांमध्ये विश्वासाचे आणि सौहार्दाचे वातावरण नाही, असा संदेश लोकांमध्ये जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लवकर निर्णय नसल्यामुळे नाराजी

जागावाटपाचा अंतिम निर्णय लवकर होत नसल्याने नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा विलंब जितका वाढत जाईल, तितके विरोधी पक्षांसमोरचे आव्हान अवघड होत जाईल, असा इशारा त्यांनी गेल्या सोमवारी दिला होता. जागावाटप झाल्यानंतर आघाडीचे धोरण ठरणार आहे. अद्याप आघाडीच्या विविध पक्षांमध्ये धोरणविषयक समानताही निर्माण झालेली नाही, अशीही चर्चा आहे.

अनेक राज्यांमध्ये समस्या

जागावाटपाची समस्या दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि अन्य काही राज्यांमध्ये असल्याचे समजते. येथे जास्तीत जास्त जागा लढविण्यासाठी मिळविण्याकरीता आघाडीच्या घटकपक्षांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे एकेका जागेसाठी अनेक विरोधी पक्षांमध्ये चुरस असल्याने समस्या निर्माण होत आहे. तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Next Article